मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणात झळकले ‘शेतकरी कर्जमुक्ती’चे पोष्टर;सुरक्षा यंत्रणांची काही काळ उडाली भंबेरी;शनी देवगाव सप्ताहस्थळी घडला प्रकार

श्रीरामपूर-नितीन शेळके
‘माय बाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’
अशा आशयाच्या मागणीचे पोष्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावल्याने काही काळ सुरक्षा यंत्रणा व पोलीस प्रशासन यांची धावपळ उडाली होती.लागलीच पोलीस प्रशासनाने ते पोस्टर त्या शेतकऱ्याच्या ताब्यातून काढून घेत व्यासपीठाकडे नेले.
अगदी अचानक घडलेल्या मिनिटभराच्या या प्रसंगाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षा यंत्रणांची मात्र भंबेरी उडाली होती.श्री क्षेत्र देवगाव शनी येथील १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या सांगता सोहळ्याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज उपस्थित होते.यावेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, गिरीश महाजन, आमदार रमेश बोरणारे, विठ्ठलराव लंघे, अमोल खाताळ, माजी आमदार स्नेहलता कोल्हे आदींसह अनेक मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.मुख्यमंत्री यांचा दौरा आणि सध्या सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या कर्जमाफी मागणी संबंधी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा यंत्रणा अगदी ‘अलर्ट मोड’वर होत्या.

शनी देवगाव सप्ताहात ‘माय बाप सरकार गोरगरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’
अशा आशयाच्या मागणीचे पोष्टर एका तरुण शेतकऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणादरम्यान झळकावले.

मुख्यमंत्री यांच्या वाहनांच्या ताफ्याच्या मार्गापासून व्यासपीठाची तसेच आजूबाजूच्या सर्व ठिकाणांची कसून तपासणी सुरक्षा यंत्रणाकडून सकाळपासूनच सुरू होती.
असे असतानाही काल्याच्या किर्तनावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण सुरू असताना ‘माय बाप सरकार गोर गरीब शेतकऱ्यांना कर्जमुक्ती द्या’या आशयाच्या मागणीचे पोष्टर घेऊन एक तरुण शेतकरी उभा राहिला.त्याने कुठल्याही प्रकारची घोषणाबाजी केली नाही.मात्र सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे दिलेले आश्वासन पाळावे अशी मागणी त्याने आपल्या त्या कृतीतून व्यक्त करत मुख्यमंत्री फडणवीस यांचे लक्ष आपल्या मागणीकडे वेधण्याचा प्रयत्न केला.अगदी मिनीटभराच्या आत हा सर्व प्रकार घडला.सुरक्षा यंत्रणानी तात्काळ शेतकऱ्याकडे धाव घेत त्याच्या हातून ते पोष्टर ताब्यात घेतले.दरम्यान सदर घटना घडत असतानाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या भाषणात आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणारच असल्याचे स्पष्ट केले.दरम्यान मागील वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजप व महायुतीच्या घटक पक्षांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे आश्वासन आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात दिले आहे.भाजपाचे देवेंद्र फडणवीस, शिवसेनेचे एकनाथ शिंदे व राष्ट्रवादीचे अजित पवार या तीनही नेत्यांनी सत्तेत आल्यानंतर पहिल्याच अधिवेशनात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू,असेही त्यांनी आश्वासित केले होते.परंतु याबाबतचे आश्वासन सरकारकडून पाळले जात नसल्याने गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमुक्तीसाठी शेतकरी संघटनेसह राज्यातील शेतकरी लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहे.

आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमच्या राज्यातल्या लाडक्या बहिणी व शेतकरी यांनी आम्हाला निवडून दिले असून त्यांना येणाऱ्या 5 वर्षांच्या काळात आम्हाला निवडून दिल्याचा पश्चाताप करायची वेळ येणार नाही,अशा प्रकारे राज्य सरकार काम करेल असे अश्वासित केले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

पोरा बाळांच्या टीकेवर नका बोलू,पण जनतेचे तर प्रश्न सोडवा-मा.खा.डॉ.सुजय विखे यांचा नाव न घेता थोरातांना खोचक टोला

श्रीरामपूर-आम्ही पोरं-बाळं यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देत नाही, असे ते म्हणतात.परंतु आम्हीही सूडबुद्धीने राजकारण करत नाही.मग आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ द्या,असा खोचक टोला मा.खा. सुजय विखे यांनी

पुणे- नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर स्टेशनला थांबा द्या;आ.हेमंत ओगले यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-नव्याने चालू झालेल्या पुणे - नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सदर पत्रात नमूद

श्रीरामपूरातील कृषी सेवा केंद्रांतून बनावट औषधांची विक्री?;’कुंपणच शेत खात’ असल्याचा गंभीर प्रकार

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना मोठंमोठ्या कंपन्यांच्या नावाने पिकांसाठी लागणारी बनावट पोषक,संप्रेरके व कीटकनाशके विक्री करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार

सैनिकांसाठी पाठविल्या ११ हजार राख्या;श्रीरामपूरच्या सौ.पूजा चव्हाण यांचा उपक्रम

श्रीरामपूर-देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना राख्या पाठविल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक

दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व नोकरी करिता बॅटरीवरील सायकल प्रदान;मा.खा.डॉ.सुजय विखे यांचे विशेष सहकार्य

श्रीरामपूर-डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर यांच्यामार्फत आणि माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या विशेष सहकार्यामुळे आज श्रीरामपूर येथील कु.दर्शना पापडीवाल या दिव्यांग

सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ परत;नेवासा पोलीसांनी विधिवत केले परत

श्रीरामपूर-नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ संबंधितांना नेवासा पोलीसांनी मंगळवारी परत केले.रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २२ हजार ४०० रुपये किमतीचे पितळी

Latest News

Trending News