मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये-महंत रामगिरी महाराज;सरला बेटाच्या १०९ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देऊ-मुख्यमंत्री फडणवीस;श्री क्षेत्र शनिदेव १७८ व्या अखंड  हारिनाम सप्ताहाची सांगता

श्रीरामपूर-
मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे.मनोवृत्ती बदल झाला  तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात आहे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचा योगीराज गंगागिरी महाराज१७८ वा अखंड हरिनाम सप्ताहातील सांगतेच्या काला किर्तनातून “कृष्णा वेध येली विरहिणी बोले” ह्या  संत ज्ञानेश्वरांच्या एका अभंगातील  कृष्णाच्या विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी स्त्री, गोपी चंद्राला पाहून म्हणते की, “हे चंद्रा, तू माझ्या अंगाला उबारा देत आहेस, पण मला चंदन लावू नकोस, वाराही घालू नकोस. कारण कृष्णाशिवाय मला काहीही चांगले वाटत नाही.”
या अभंगात, विरहिणी स्त्री कृष्णाच्या विरहाने किती दुःखी आहे, तिची व्याकुळता, आणि कृष्णाशिवाय तिला कशातच आनंद मिळत नाही हे विरहान रचनेतून महाराजांनी स्पष्ट  केले आहे. रचनेचे विवेचन करताना महाराज पुढे म्हणाले की, आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व  काळातही महाराजांनी सप्ताह अनेक अडचणी ला सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले.  अध्यात्मात आल्यास भजन – किर्तन नाही आले तरी चालेल परंतु वाईट मार्गाने तरी तरुण जाणार नाही. अध्यात्मिक मार्गावर चालल्यास तरुणाना चांगली दिशा मिळेल अशा दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकत असल्याचे महाराज म्हणाले.

श्री क्षेत्र गोदाधाम सराला बेटाचा योगीराज गंगागिरी महाराज १७८ वा अखंड हरिनाम सप्ताहातील सांगतेच्या काला किर्तनात उपदेश करताना महंत रामगिरी महाराज.

याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की,या भागातील सरला बेटाचा विकास करण्यासाठी १०९ कोटी रुपयांचा विकास आराखडा तयार करण्यात आला आहे. हा आराखडा लवकरात लवकर कार्यान्वित करण्यासाठी मान्यता देण्यात येईल. तसेच देवगाव शनि येथील उच्च पातळी बंधाऱ्याची मागणीही  पूर्ण करु, तसेच या सोहळ्याला दरवर्षी येईन असेही आश्वासन त्यांनी दिले.यावेळी जलसंधारण मंत्री गिरीश महाजन,नामदार राधाकृष्ण विखे पाटील,सुदशन चनलचे सुरेश चव्हाणके आमदार रमेश पा बोरणारे,आमदार विठ्ठलराव लंघे,आमदार अमोल खताळ, माजी आमदार भानुदास मुरकुटे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार भाऊसाहेब कांबळे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे,दिनेशभाऊ परदेशी,आविनाश पा गंलाडे डॉ प्रकाश शेळके सावदा आश्रमाचे मंहत कृष्णगिरी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योंगानंद महाराज विक्रम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्या सह  लाखो भाविकांनी बुंदी व चिवडाचा महाप्रसाद
घेतला.

अखंड हरिनाम सप्ताहात मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.

Leave a Comment

संबंधित बातम्या

पोरा बाळांच्या टीकेवर नका बोलू,पण जनतेचे तर प्रश्न सोडवा-मा.खा.डॉ.सुजय विखे यांचा नाव न घेता थोरातांना खोचक टोला

श्रीरामपूर-आम्ही पोरं-बाळं यांनी केलेल्या टिकेवर उत्तर देत नाही, असे ते म्हणतात.परंतु आम्हीही सूडबुद्धीने राजकारण करत नाही.मग आमच्यावर टीका टिप्पणी करण्यापेक्षा जनतेचे प्रश्न सोडवण्यास वेळ द्या,असा खोचक टोला मा.खा. सुजय विखे यांनी

पुणे- नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर स्टेशनला थांबा द्या;आ.हेमंत ओगले यांची केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-नव्याने चालू झालेल्या पुणे - नागपूर वंदे भारत एक्सप्रेसला बेलापूर रेल्वे स्थानकावर थांबा द्या अशी मागणी आमदार हेमंत ओगले यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विन वैष्णव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.सदर पत्रात नमूद

श्रीरामपूरातील कृषी सेवा केंद्रांतून बनावट औषधांची विक्री?;’कुंपणच शेत खात’ असल्याचा गंभीर प्रकार

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याच्या पूर्व भागातील नामांकित कृषी सेवा केंद्रातून शेतकऱ्यांना मोठंमोठ्या कंपन्यांच्या नावाने पिकांसाठी लागणारी बनावट पोषक,संप्रेरके व कीटकनाशके विक्री करण्याचा संतापजनक प्रकार सुरू आहे.अनेक दिवसांपासून सुरू असलेला हा गंभीर प्रकार

सैनिकांसाठी पाठविल्या ११ हजार राख्या;श्रीरामपूरच्या सौ.पूजा चव्हाण यांचा उपक्रम

श्रीरामपूर-देशाच्या सुरक्षेसाठी सीमेवर सैनिक आपले कर्तव्य बजावत असून त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्रीरामपूर येथील सौ.पूजा हर्षद चव्हाण यांनी ११ हजार जवानांना राख्या पाठविल्या आहेत.गेल्या काही वर्षांपासून पूजा चव्हाण या सामाजिक

दिव्यांग व्यक्तीला व्यवसाय व नोकरी करिता बॅटरीवरील सायकल प्रदान;मा.खा.डॉ.सुजय विखे यांचे विशेष सहकार्य

श्रीरामपूर-डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र व प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र अहिल्यानगर यांच्यामार्फत आणि माजी खासदार डॉ.सुजय विखे यांच्या विशेष सहकार्यामुळे आज श्रीरामपूर येथील कु.दर्शना पापडीवाल या दिव्यांग

सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ परत;नेवासा पोलीसांनी विधिवत केले परत

श्रीरामपूर-नेवासा तालुक्यातील रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर मंदिरातून चोरीस गेलेल्या भजनी मंडळाचे २८ टाळ संबंधितांना नेवासा पोलीसांनी मंगळवारी परत केले.रांजणगाव देवीचे येथील सिद्धेश्वर भजनी मंडळाचे २२ हजार ४०० रुपये किमतीचे पितळी

Latest News

Trending News