खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांना त्यांचे अनुभव विचारा-मा.खा.डॉ. विखे यांचा खोचक टोला;अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन

श्रीरामपूर-
माझी विरोधकांना विनंती आहे की खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. ज्यांनी ती केली त्यांना ती अजिबात परवडली नाही.हवं तर वेळ काढून त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांचा अनुभव व त्यांचे दुःख विचारा,असा खोचक टोला मा.खा.डॉ. सुजय विखे पाटील यांनी आज श्रीरामपूरात कुणाचेही नाव न घेता लगावला.परंतू त्यांचा रोख नेमका कोणाकडे आहे, हे उपस्थितांच्या लक्षात आले.आज अशोकनगर फाटा ते अशोकनगर या ५० लाख रूपये खर्चाच्या रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते झाले.त्यावेळी ते बोलत होते.यावेळी गिरीधर आसने, दिपक अण्णा पटारे, बाबासाहेब चिडे, नानासाहेब पवार, संजय फंड, जितेंद्र छाजेड, शरद नवले, पोपटराव जाधव, विठ्ठलराव राऊत, गणेश मुदगुले, अक्षय राऊत, शामलिंग शिंदे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.यावेळी डॉ. सुजय विखे पाटील पुढे म्हणाले, श्रीरामपूर तालुका आणि विखे पाटील कुटूंबाचे वर्षानुवर्षाचे ऋणानुबंध आणि प्रेम आहे. या विश्वासाला आणि या प्रेमाला कदापि तडा जाऊ देणार नाही.विरोधकांमध्ये धमक असेल तर त्यांनी काय काम केले? ते सांगावे. नुसती चिखलफेक करू नये.आम्ही काय केले नाही, ती टिका फक्त करू नका. चिखलफेक करण्यापेक्षा श्रीरामपूर तालुक्याच्या विकासाचा अनुषेश भरून काढण्यासाठी मदत करा. माझ्यावर भविष्यात टिका होणार आहे.मीही त्याला जशाच तसे उत्तर देईल. स्व. बाळासाहेब विखे पाटील, स्व. जयंतराव ससाणे व नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी एकत्रित श्रीरामपूरचा विकास सुरू केला होता. परंतु, त्यानंतर १५ वर्षे हा तालुका विकासाच्या बाबतीत मागे राहीला. खंडकऱ्यांच्या वर्ग-२ च्या जमिनी वर्ग-१ केल्या. जमीन वाटपाचा ऐतिहासिक निर्णय घेतला.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा प्रश्न मार्गी लावला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्यासाठी आजच दीड कोटी रूपयांच्या निधीची घोषणा केली. येत्या पुढील सहा महिन्यात केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे.
प्रवरा उजव्या आणि डाव्या दोन्ही कालव्याच्या आणि त्याच्या पोटचाऱ्या यांच्या नूतणीकरणासाठी २५० कोटींचा निधी जलसंधारणमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या माध्यमातून उपलब्ध करून हे काम होणार आहे.

अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजनप्रसंगी बोलताना मा. खा.डॉ.सुजय विखे पाटील.

आज छोटया गोळ्या पुढे डोस वाढवू
मी डॉक्टर असल्याने एकदम जर डोस वाढवला तर पेशंट कोमात जातो हे मला माहीत आहे. त्यामुळे यापेक्षा जास्त बोलत नाही, आज छोटया गोळया दिल्या आहेत, पुढे डोस वाढवू आणि श्रीरामपूर तालुक्यातील पेशंट बरे करू असेही खा. डॉ. सुजय विखे पाटील शेवटी म्हणाले.

Leave a Comment

संबंधित बातम्या

मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये-महंत रामगिरी महाराज;सरला बेटाच्या १०९ कोटींच्या विकास आराखड्याला मान्यता देऊ-मुख्यमंत्री फडणवीस;श्री क्षेत्र शनिदेव १७८ व्या अखंड  हारिनाम सप्ताहाची सांगता

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे.मनोवृत्ती बदल झाला  तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात

आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;संतशक्ती पाठीशी उभी राहिल्याने विजय सुकर;श्री क्षेत्र देवगाव शनी  येथील १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

श्रीरामपूर-नितीन शेळकेलोकसभा निवडणूकित आमच्या विरोधात ‘व्होट जिहाद’चा प्रयोग झाला.काही मूठभर लोकांनी राष्ट्रीय व अध्यात्मिक विचार संपवण्याचा विडाच उचलला होता. ही मंडळी संतांच्या विचारांनाही नष्ट करू पाहत होती. मात्र आमच्यासाठी संतशक्ती

खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांना त्यांचे अनुभव विचारा-मा.खा.डॉ. विखे यांचा खोचक टोला;अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन

श्रीरामपूर-माझी विरोधकांना विनंती आहे की खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. ज्यांनी ती केली त्यांना ती अजिबात परवडली नाही.हवं तर वेळ काढून त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांचा अनुभव व त्यांचे

बचत गटाच्या चळवळीने महीलांना स्वयपूर्ण आणि आत्मनिर्भर केले-मा. खा.डाॅ.विखे पाटील;महीला बचत गटाना पापड उत्पादन मशिन आणि अनुदानाचे वाटप

श्रीरामपूर-महिला बचत गटाची चळवळ  केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीशील व्हावी ,चळवळीशी जोडल्या गेलेल्या महीला  स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होत असल्याचे प्रतिपादन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला बचत गटांना

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

Latest News

Trending News