भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-
हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात होते आज ते नाहीत.त्यामुळेच आजची पिढी बिगडत चालली आहे.त्यास शिक्षण संस्था जबाबदार आहे.वाट्सअप व फेसबुक मुळे मनोविकार वाढत आहे. त्याला जबाबदार कोण असा सवाल करत, ते सुधारण्यासाठी अध्यात्म – संस्कृतीची गरज आहे असे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.श्री क्षेत्र शनि देवगाव सप्तकुषी येथे गोदातीरी सुरू असलेल्या सदगुरु गंगागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्तहातील सहाव्या दिवशीच्या  प्रवचन पुष्प गुंफताना महाराज बोलत होते.  परमार्थ हे महाधन आहे, रामनाम रुपी ज्याच्याकडे आहे तो श्रीमंत आहे. जगामध्ये कोणी धनवान नाही. लक्ष्मीचा जेथे मोठेपणा चालला नाही, तिथे आपण कोण? सिकंदर जब दुनिया से चला तब दोनो हात खाली थे असे सांगत महाराज म्हणाले, जग जिंकले, कितीही संपत्ती असली तरी आपण काही घेवुन जात नाही. आशेमुळे जिवनात अनेक समस्या निर्माण होतात. आशा ही माणसाला वर्तमानात ठेवत नाही, ती भविष्यात घेवुन जाते.  

आज पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण व मोबाईलचा वाढता अतिवापर यामुळे मनुष्य दिशाहीन झाला आहे तरुण मोबाईलच्या खेळात व्यस्त झाला आहे,
तरुणाई हा समाजाचा आधारस्तंभ असतो. त्यामुळे, त्यांनी योग्य मार्गावर चालावे यासाठी आध्यात्मिक ज्ञानाची आवश्यकता आहे. आध्यात्मिक मार्गाचा स्वीकार युवकांनी केल्यास एक संतुलित आणि यशस्वी जीवन जगण्यास मदत होईल. असे महाराज म्हणाले याप्रसंगी माजी खासदार चंद्रकांत खैरे, वैजापुरचे आमदार रमेश पा बोरणारे सर, गंगापूरचे आमदार प्रशांत बंब,विश्व हिंदू परिषदचे सुनील धनवट,कमलाकर कोते, राजेंद्र सांळुके,मनाजी मिसाळ,कडुभाऊ काळे, बाळासाहेब कापसे बाबासाहेब चिडे रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योंगानंद महाराज, विश्वनाथ गिरीजी महाराज, अर्जुन महाराजविकम महाराज,सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज,यांच्यासह लाखो भाविकाची उपस्थित होते

सदगुरु गंगागिरी महाराज १७८ व्या अखंड हरिनाम सप्तहातील सहाव्या दिवशी प्रवचन पुष्प गुंफताना महंत रामगिरी महाराज.

Leave a Comment

संबंधित बातम्या

खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांना त्यांचे अनुभव विचारा-मा.खा.डॉ. विखे यांचा खोचक टोला;अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन

श्रीरामपूर-माझी विरोधकांना विनंती आहे की खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. ज्यांनी ती केली त्यांना ती अजिबात परवडली नाही.हवं तर वेळ काढून त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांचा अनुभव व त्यांचे

बचत गटाच्या चळवळीने महीलांना स्वयपूर्ण आणि आत्मनिर्भर केले-मा. खा.डाॅ.विखे पाटील;महीला बचत गटाना पापड उत्पादन मशिन आणि अनुदानाचे वाटप

श्रीरामपूर-महिला बचत गटाची चळवळ  केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीशील व्हावी ,चळवळीशी जोडल्या गेलेल्या महीला  स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होत असल्याचे प्रतिपादन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला बचत गटांना

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

Latest News

Trending News