कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर-

‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक येथे कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाची स्थापना करून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यालयाच्या निमित्ताने या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या कार्याला प्रत्यक्ष सुरुवात झाली आहे.याप्रसंगी ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते.कार्यालयाचे उद्घाटन अन्न व नागरी पुरवठा मंत्री श्री. छगनजी भुजबळ, मंत्री श्री. नरहरीजी झिरवाळ, मंत्री श्री. माणिकरावजी कोकाटे, खासदार श्री. भास्करराव भगरे, आमदार श्री. दिलीप बनकर, आमदार डॉ. राहुल आहेर, आमदार श्री. राहुल ढिकले, आमदार श्री. आशुतोष काळे, श्री. काशिनाथ दाते, आमदार श्री. अमोल खताळ, आमदार श्री. विठ्ठलराव लंघे यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि जलसंपदा विभागाचे सर्व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

ना. राधाकृष्ण विखे पाटील पुढे म्हणाले की,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातुन दुष्काळमुक्त महाराष्ट्राचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने जलसंपदा विभागाने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचलले आहे.‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकणातील अनेक भागांना नवसंजीवनी मिळणार आहे.जलसंधारण, शेती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनमान उन्नतीसाठी हा प्रकल्प मैलाचा दगड ठरणार आहे. हे पाऊल म्हणजे “एक महाराष्ट्र, दुष्काळमुक्त महाराष्ट्र” या ध्येयाच्या दिशेने घेतलेली ठोस वाटचाल आहे,असेही ते शेवटी म्हणाले.

नाशिक येथे कोकण-गोदावरी नदीजोड प्रकल्पाच्या कार्यालयाची स्थापना करून आज त्याचे उद्घाटन करण्यात आले याप्रसंगी मार्गदर्शन करताना जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील.

Leave a Comment

संबंधित बातम्या

खालच्या पातळीची टीका करणाऱ्यांना त्यांचे अनुभव विचारा-मा.खा.डॉ. विखे यांचा खोचक टोला;अशोकनगर फाटा ते अशोकनगर रस्त्याच्या कामाचे भुमीपूजन

श्रीरामपूर-माझी विरोधकांना विनंती आहे की खालच्या पातळीवर जाऊन टीका करू नका. ज्यांनी ती केली त्यांना ती अजिबात परवडली नाही.हवं तर वेळ काढून त्यांची भेट घेऊन त्यांना त्यांचा अनुभव व त्यांचे

बचत गटाच्या चळवळीने महीलांना स्वयपूर्ण आणि आत्मनिर्भर केले-मा. खा.डाॅ.विखे पाटील;महीला बचत गटाना पापड उत्पादन मशिन आणि अनुदानाचे वाटप

श्रीरामपूर-महिला बचत गटाची चळवळ  केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्ष कृतीशील व्हावी ,चळवळीशी जोडल्या गेलेल्या महीला  स्वयंपूर्ण आणि आत्मनिर्भर होत असल्याचे प्रतिपादन डॉ सुजय विखे पाटील यांनी केले. महाराष्ट्रात पहिल्यांदाच महिला बचत गटांना

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

Latest News

Trending News