भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-
भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने
बेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की,
दिनांक 01/08/2025 रोजी दिपक बाळासाहेब चव्हाण, (माजी नगरसेवक) वय 44 वर्षे, रा. बाजारतळ, वॉर्ड नं.03, श्रीरामपूर हे रात्री 10/30 वा. सुमारास भगतसिंग चौक श्रीरामपूर येथुन त्यांच्या घरी बाजारतळ वॉर्ड नं.03, श्रीरामपूर येथे जाण्यासाठी गिरमे चौकमार्गे किशोर टॉकीज समोरुन जात असताना अचानक त्यांचा पाठलाग करत तीन ते चार मोटारसायकल आल्या.त्यावरील 5 ते 6 अनोळखी तरुणांनी त्यांना रस्त्यात अडवुन जातीवाचक शिवीगाळ करुन मोटारसायकलवरुन खाली ओढुन लाथाबुक्यांनी मारहाण केली.त्यांच्या गळयातील दोन तोळ्यांची सोन्याची चॅन काढून घेत त्यांना जिवे ठार मारण्याची धमकी देवुन पळून गेले. या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला गुरनं. 727/2025 भारतीय न्याय संहिता कलम 126 (2), 119 (1), 189(2),191(2),190,115(2),
352,351(2) प्रमाणे दि. 02/08/2025 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.सदरचा गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत पोलिसांच्या तपास पथकास सदरचा गुन्हा करणाऱ्या आरोपींचे नाव निष्पण करुन त्यांचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या. तपास पथकाने घटनास्थळी जावुन तांत्रिक विश्लेषन करुन गुप्त बातमीदारामार्फत सदरचा गुन्हा करणाऱ्या आरोपींचे नाव निष्पण केले असता त्यांची नावे अरबाज जाकीर शेख, वय 24 वर्षे, रा. राममंदिर जवळ, वॉर्ड नं. 05 श्रीरामपूर जि. अहिल्यानगर, हुजेब अनिस शेख, वय 21 वर्षे, रा. मोरगेवस्ती टॉवर जवळ, वॉर्ड नं. 07, श्रीरामपूर, समीर मोहम्मद शेख, वय 22 वर्षे, रा.लोणारगल्ली वॉर्ड नं. 05, श्रीरामपूर जि. अहिल्यानरग., आकाश राजेंद्र चौगुले, वय 23 वर्षे, रा. मोरगेवस्ती वॉर्ड नं.07, श्रीरामपूर, लक्ष्मण जनार्दन साबळे रा. विजय हॉटेलच्या मागे, वॉर्ड नं. 07, श्रीरामपूर असे असल्याचे पोलिसांना समजले.आरोपींचा शोध घेत असताना पोलीस पथकास गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, यातील आरोपी क्रं. 01 ते 04 हे बेलापूर परिसरात येणार आहे. त्यावरून तपास पथकाने बेलापूर परिसरात सापळा लावुन सदरचे आरोपी आल्याची खात्री होताच त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे सदर गुन्हयाबाबत सखोल तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा केला असल्याची कबुली दिल्याने त्यांना नमुद गुन्हयात चोवीस तासाच्या आत तात्काळ अटक करण्यात आली आहे.

माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकाने अटक केली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

Latest News

Trending News