लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-
लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे, अशी माहिती पद्मश्री विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन व डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिली. या जागेवर रहिवाशांसाठी अर्धा गुंठा जमीन वाटून त्यांच्या नावे घरकुल बांधले जाणार आहे.या अनुषंगाने भीमनगर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील बोलत होते. गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.उर्वरित जागेत अंगणवाडी करण्यात येणार असून, त्या परिसरात सार्वजनिक शौचालय, नाल्या, काँक्रीट रस्ते, पाणीपुरवठा योजना, विद्युत डीपी, सौरदिवे अशा मूलभूत सुविधा विकसित करण्यात येणार आहेत. “विकासकामात कुठेही अडथळा येऊ देणार नाही. आणि जेव्हा ही घरे पूर्ण होतील, तेव्हा मी प्रत्येक कुटुंबासोबत बसून जेवायला येईन,असे भावनिक उद्गार डॉ. विखे पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

लोणी खुर्द गावाच्या सर्वांगीण विकासासाठी जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील व जिल्हा परिषद माजी अध्यक्षा सौ. शालिनी विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकासकामांसाठी मंजूर ८ कोटींच्या निधीतून अनेक कामांचे भूमिपूजन डॉ. सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.या कामांमध्ये शौचालय बांधणे, रस्त्यांचे काँक्रीटीकरण, सांडपाणी गटार व्यवस्था, पाझर तलाव दुरुस्ती, रस्ता मजबुतीकरण, मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत रस्ते, वॉल कंपाऊंड उभारणी, पाणी फिल्टरेशन प्लांट बसविणे, तसेच बंदिस्त गटार यांचा समावेश आहे.याच कार्यक्रमात डॉ. सुजय विखे पाटील यांनी येत्या ऑक्टोबर महिन्यात १२ ते १६ दरम्यान लोणी खुर्द येथे आयोजित प्रदीप मिश्रा महाराज यांच्या शिवपुराण कथेसाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे आणि अध्यात्मिक लाभ घ्यावा, असे आवाहन केले.कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिक, महिला, युवक, ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित नागरिकांनी या निर्णायक विकास टप्प्याचे स्वागत करत डॉ. सुजय विखे पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.

लोणी खुर्द येथील भीमनगर परिसरात आयोजित कार्यक्रमात मा. खा.डॉ.सुजय विखे पाटील.

Leave a Comment

संबंधित बातम्या

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

Latest News

Trending News