अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-
मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती बदलण्याची ताकद फक्त अध्यात्मामध्ये व अखंड हरिनाम सप्ताहात आसल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.
श्री क्षेत्र देवगाव शनी व सप्तक्रोषी येथील योगीराज गंगागिरी महाराज १७८वा अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशी चे भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन पुष्प गुंफताना रामगिरी महाराज पुढे म्हणाले की,  भगवंत भक्ताची जात बघत नाही जो भंगवताची भक्ती करतो त्याला तो प्राप्त होतो.सप्ताहातील भजनाने भव्ताच्या मनाची शुध्दी होते एखादी वस्तू अतिदुर असली तर दिसत नाही डोळ्यातील अंजन स्वतःला दिसत नाही त्याप्रमाणे नास्तिकाला देव दिसत नाही पण गंगागिरी महाराज भजनात भजनाने  मनुष्याच्या जीवनात समाधान मिळते आज समाजाला अध्यात्माची फार मोठी गरज आहे.गंगागिरी महाराज यांच्या अखंड हरिनाम सप्ताहातुन अनेकांचे व्यसन नष्ट झाले स्वातंत्र्यपूर्व  काळातही महाराजांनी सप्ताह अनेक अडचणी ला सामोरे जात प्रभावीपणे सप्ताह सुरू ठेवले आज समाजाची अवस्था पाहिली तर साठ टक्के समाज बिघडलेला आहे, व्यसनाधिन झाला आहे, कुठलही व्यसन विचारा अनेक व्यसनं आहेत.

महंत रामगिरी महाराज

ज्याला वाईट व्यसनं म्हणतो ते आहेच त्याबरोबरच संपत्ती,सत्ता,संतती हे देखिल व्यसनातील प्रकार आहेत. याच्या पाठीमागेच समाज लागलेला आहे व बिघडलेला आहे. आणि म्हणून या समाजाला खर्‍या अर्थानं शांती मिळत नाही. चाळीस टक्के समाज थोडा आहे तो कुठं याच्यापेक्षा काहीतरी वेगळं मिळावं म्हणून तो विचार करतो पण तोही दिशाहिन आहे, त्याला योग्य दिशा मिळेना झालीय. दिशाहिन समाजाला योग्य दिशा देऊ कोण देत असेल तर ते फक्त अखंड हरिनाम सप्ताहाच देऊ शकतो. मनुष्य अज्ञान झाकण्यासाठी पाप करतो. योगीराज गंगागिरी महाराज यांनी अनेक भक्तांच्या जीवनातील दुःख दूर करून सन्मार्गावर आणले. महाराजांनी पारतंत्र्यात अनेक अडचणींना सामोरे जात वेळ प्रसंगी माधुकरी मागवत कन्या घुगऱ्या शिजवत समाजासाठी अन्नदान सुरू ठेवले असेही महाराज म्हणाले.याप्रसंगी प्रमुख उपस्थित डॉ दिनेशभाऊ परदेशी,पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकरजी शिंदे,अनुराधाताई आदिक,कुष्णा पा डोणगावकर,डॉ राजीव डोंगरे,नवनाथ महाराज मस्के,बाळासाहेब महाराज रंजाळे,ऊत्तम महाराज गाढे,अमोल महाराज गाढे रामभाऊ महाराज,व्रिकम महाराज,राजेश्र्वरगिरीजी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरीजी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज,योगानंद महाराज सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज यांच्यसह 4 ते 5 लाख भाविकांची उपस्थिती होती.

योगीराज गंगागिरी महाराज १७८वा अखंड हरिनाम सप्ताहातील चौथ्या दिवशी भगवद्गीतेच्या अकराव्या अध्यायातील श्लोकावर प्रवचन पुष्प गुंफताना रामगिरी महाराज.

शेकडो भाविक करतात सप्ताहात रक्तदान
लोकमान्य बल्ड बँक, आदर्श ब्लड बँक, नित्य सेवा ब्लड बँक, सोलापूर ब्लड बँक अशा 4 रक्तपेढी वतीने दररोजचे 250 ते 300 भाविकांचे रक्त संकलन केले जाते त्याचबरोबर सप्ताह परिसरातील सर्व डॉक्टरस फामस्टीक 7 डॉक्टर मित्र परिवाराच्या वतीने 800 ते 1000 रुग्ण भाविकाचा विनामूल्य  उपचार केला जातो

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News