श्रीरामपूर-
आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या हद्दीत ‘कोंबींग-ऑपरेशन ऑलआउट’ राबविण्यात आले.त्याद्वारे अवैध धंदे व आरोपींवर पोलिसांनी कारवाई केली.
पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशान्वये व अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘ऑपरेशन ऑलआउट’ राबविण्यात आले.त्यामध्ये एकूण 431 समन्सची बजावणी करण्यात आलेली आहे.एकूण 131 बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. एकूण 107 नॉन बेलेबल वॉरंटची बजावणी करण्यात आलेली आहे. ह्या व्यक्तींना विविध न्यायालयांनी अटक वॉरंट जारी केले होते. त्यांना अटक करून आज रोजी न्यायालयात हजर करण्यात आले आहे.दारूबंदी कायद्या खाली संपूर्ण हद्दीमध्ये विविध ठिकाणी छापे टाकण्यात आले. त्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (ई) प्रमाणे 28 व्यक्तींवर गुन्हे दाखल करण्यात आले व अवैध दारू जप्त करण्यात आली. तसेच दारू पिऊन सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालणाऱ्या 10 व्यक्तींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम कलम 85(1) प्रमाणे 10 गुन्हे दाखल करण्यात आले. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदाखाली विविध ठिकाणी जुगार खेळणाऱ्यांवर छापे टाकण्यात आले.

महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम 12(अ) नुसार त्या सर्वांवर 13 गुन्हे दाखल करण्यात आले.रात्रीच्या वेळी गुन्हा करण्याच्या उद्देशाने संशयास्पदरित्या फिरणाऱ्या 5 व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले.त्यांच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 122 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच रात्रीच्या वेळी संशयास्पद मालमत्ता ताब्यात मिळून आलेल्या 5 व्यक्तीदेखील मिळून आल्या. त्या पाचही व्यक्तींवर महाराष्ट्र पोलीस कलम 124 प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले. त्यांच्याकडील संशयित मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत.दारू पिऊन वाहन चालविणाऱ्या 11 जणांवर कारवाई करण्यात आलेली आहे. विविध पोलीस स्टेशन हद्दीतील गुन्हा करून फरार असणाऱ्या आरोपींची शोध मोहीम राबविण्यात आली. त्यापैकी 3 आरोपी मिळून आल्याने त्यांना अटक करण्यात आलेली आहे.अवैधरित्या हत्यार बाळगणारे आरोपींवर कारवाई करून हत्यार कायदा कलम 4/25 प्रमाणे 3 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. मोटार वाहन कायद्यान्वये एकूण 80 केसेस करून 65900/- रू. दंड वसूल करण्यात आलेला आहे. श्रीरामपूर विभागातील सर्व तडीपार आरोपींची चौकशी करण्यात आली. त्यापैकी नेवासा पो.स्टे. हद्दीत 1 आरोपी मिळून आल्याने त्याचेविरूद्ध म.पो.का.क. 142 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. संगमनेर तालुका पोस्टे. हद्दीतील शिक्षा पात्र वॉरंट स्पेशल केस नं. 18/2009 मधील आरोपी आनंदा किसन चौधरी वय – 42 वर्षे रा. शिरसगाव धुपे ता. संगमनेर यांस मा. सत्र न्यायालयाने 3 वर्षे शिक्षा सुनावली होती. त्यास ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे.सदर ऑपरेशन सुनिल पाटील, उ.वि.पो.अधीकारी शेवगाव, बसवराज शिवपूजे, उप.वि.पो.अधीकारी श्रीरामपूर, शिरीष वमने, उप.वि.पो.अधीकारी, शिर्डी व कुणाल सोनवणे, उप.वि.पो.अधीकारी, संगमनेर उपविभाग यांच्या देखरेखीखाली पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी, दुय्यम अधिकारी त्याचप्रमाणे पोलीस स्टेशनचे कर्मचारी यांनी राबविले.
