आ.ओगलेंनी बालिशपणा बंद करावा;अन्यथा डॉ. आंबेडकर पुतळ्याजवळही येऊ देणार नाही;आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांचा इशारा

श्रीरामपूर-आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा...

श्रीरामपूर-
आ.हेमंत ओगले यांनी शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या कामाचे विनाकारण श्रेय घेऊ नये. तसेच पुन्हा असा बालिशपणा केल्यास आंबेडकरी जनता आमदार हेमंत ओगले यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळही येऊ देणार नाही,असा इशाराच बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समिती अध्यक्ष सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल,सचिन ब्राह्मणे, प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ यांनी दिला आहे.
शहरात उभारल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याच्या जागेचे  सर्वेक्षण करण्यासाठी पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी 23 जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालय अहिल्यानगर येथे बैठकीत सक्त आदेश दिला होता.त्या आदेशाच्या अनुषंगाने आज दिनांक 31 जुलै रोजी बारा वाजता वनविभागाचे वन परिक्षेत्र अधिकारी निलेश रोटे उपाधीक्षक भुमिअभिलेख रवींद्र खरोटे नगर अभियंता सूर्यकांत गवळी अधिकारी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची जागेची स्थळ पाहणी करण्यासाठी येत असता आमदार हेमंत ओगले यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयात बोलून घेतले.त्यानंतर त्यांना आमदार ओगलेनी त्यांच्या सरकारी गाडीतून उतरून आंबेडकरी जनतेला देखावा करण्यासाठी स्वतःच्या गाडीत बसून डॉ.आंबेडकर पुतळ्याकडे  घेऊन आले. तिथे अधिकाऱ्यांना स्थळ पाहणी करू न देता व्हिडिओ शूटिंग तसेच  फोटोसेशन करून माध्यमांना बाईट देऊन जणू काही आपणच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या परवानगीसाठी पुढाकार घेत आहोत असा देखावा करण्याचा प्रयत्न करून निघून गेले. त्यामुळे त्या ठिकाणी उपस्थित असलेले सुभाष त्रिभुवन, भीमराज बागुल,सचिन ब्राह्मणे, प्रकाश ढोकणे, संतोष मोकळ या झालेल्या प्रकारामुळे आमदार हेमंत ओगलेंचा तीव्र निषेध केला.त्यानंतर संबंधित अधिकारी पुन्हा दोन तासाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ येऊन स्थळपाहणी करून जागा निर्वाणीकरण झाल्याबाबतचा अहवाल शासनाकडे सुपूर्त केला आहे.त्यामुळे जसा छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा झाला. त्याचबरोबर भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा  पूर्णाकृती बसवण्यासाठी नामदार राधाकृष्ण विखे पा. यांचे युद्धपातळीवरून काम चालू असून यात माजी खासदार सुजय विखे पाटील यांनी लक्ष घालून त्यांचे स्वीय सहाय्यक अंजाबापू गोल्हार, पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी गेली सात-आठ महिन्यापासून अनेक अडचणी दूर करून पुतळ्याच्या जागेचे काम प्रगतीपथावर आणले आहे.यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, अंजाबापू गोल्हार, श्रीनिवास  बिहानी, संतोष मोकळ, चरण त्रिभुवन, दादासाहेब बनकर, संजय रूपटक्के, अमोल काळे, बाळासाहेब हिवराळे, विशाल सुरडकर, भाऊसाहेब खरात, दत्ता खेमनर, भैय्या भिसे,संजय गांगड, सतीश सौदागर,बंडू शिंदे, संजय बोरगे आदी उपस्थित होते.

जागेचे सर्वेक्षण करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमवेत सुभाष त्रिभुवन,
यावेळी मा. सभापती दीपक पटारे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, अंजाबापू गोल्हार, श्रीनिवास  बिहानी आदी.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!