श्रीरामपूर-
प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या दंडकारण्य भुमिमध्ये गंगागिरी महाराज यांचा सप्ताह होत आहे गोदावरी तीरी आपण प्रयागराज मंहाकुभाची अनभुती घेत आहेत सप्तहाच्या माध्यमातून भक्ती,ज्ञान व अन्नदानाचा एकप्रकारे महायज्ञच असतो व आपण सर्व त्या परमात्म्यासाठी हा तपस्या यज्ञ करत असल्याचे प्रतिपादन महंत रामगिरी महाराज यांनी केले.श्री क्षेत्र शनिदेव गाव शिवारातील गोदातीरी माळावर आयोजित सद्गुरु योगीराज गंगागिरी महाराज १७८व्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या दुसऱ्या दिवशीचे दिवशीचे प्रथम प्रवचन पुष्प गुंफतानी ते बोलत होते .सुमारे तीन लाख भाविकांच्या उपस्थितीत भगवतगितेच्या 11 व्या अध्यायातला 54 श्लोकावर बोलताना महाराज म्हणाले की,.मन बुद्धीच्या पलीकडे असते,प्रत्येकाच्या आवडी भिन्न ,संस्कार भिन्न आहे ,जगातील सर्वात पवित्र वस्तू ज्ञान आहे ज्ञान हे प्राप्त करता येत नसून ते अंतरंगातून प्रकट होत असते.हे शास्त्र सांगते,परमात्मा हा अणु- रेणू पेक्षा लहान तर विचार केल्यास आकाशा एवढा मोठा आहे .बुद्धी व ज्ञानाची देवता असलेल्या गणेशाबद्दल समाजात गैरसमज पसरविले जात आहे .परंतु सबका मलीक एकच परमात्मा आहे.

दुसऱ्याचे ऐकून घेण्याची क्षमता ज्यांच्यात नसते ते जीवनात कधीच मोठे होऊ शकत नाही .ज्ञान प्राप्ती साठी चित्तशुध्दीची गरज असते,त्यासाठी कामना विरहीत मन करावे ,मनाला सुमन बनवावे म्हणजे परमात्मा आपल्या आंतरंगात वास करेल ,प्रत्येक जीवाच्या ह्दयात राहून भगवंत त्याच्या कर्मानुसार त्याला फिरवत असतो,असे महाराज म्हणाले . कली युगात आपल्याला वनात जाऊन हजारो वर्ष तप करणे शक्य नसते म्हणूनच सर्वसामान्य जिवाने सप्ताहातील ज्ञानदान यज्ञदान अन्नदान या परंपरा अनुभवल्या पाहिजे त्यासाठी योगीराज गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यांच्या सानिध्यात यावे लागेल या गोदातीरी प्रमुख प्रभू रामचंद्राने अभयारण्यात वास्तव्य केले त्याच गोदा दामात योगिराज गंगागिरी महाराज ब्रह्मली नारायणगिरी महाराज यासारख्या संताच्या सानिध्यात आपण ज्ञान यज्ञ अन्नदान यासारख्या परंपरा पुढे नेत आहोत येथील आनंद भक्ती अध्यात्म ज्ञानदान अन्नदान भक्तिमय वातावरण पाहून पंढरीचा पांडुरंग ही आज पंढरीत नसून या ठिकाणीच वास करत असेल असे महाराज म्हणाले.याप्रसंगी गणेश आश्रमाचे विष्णु गिरी महाराज,ज्ञांनानंदगिरीजी महाराज,चैतन्यनंदगिरीजी महाराज,विश्र्वनाथगिरीजी महाराज,राजेश्र्वरगिरीजी महाराज,रामदरबार आश्रमाचे हरिशरणगिरी महाराज,शिवगिरी आश्रमाचे संदिपान महाराज सरला बेटाचे विश्र्वस्त मधुकर महाराज,यांच्यासह लाखो भाविकांची उपस्थिती होती.
