डॉ.आंबेडकर पूर्णकृती पुतळा स्मारकाच्या जागेची अधिकाऱ्यांकडून पाहाणीआ.ओगले यांचीही उपस्थिती*

श्रीरामपूर-श्रीरामपूर येथील भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागेची अधिकाऱ्यांसमवेत आ. हेमंत ओगले यांनी पाहणी करून कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर येथील भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागेची अधिकाऱ्यांसमवेत आ. हेमंत ओगले यांनी पाहणी करून कागदपत्रांची पूर्तता करण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या आहेत.गेल्या आठवड्यात आ.ओगले यांनी श्रीरामपूरच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली होती.सदर बैठकीमध्ये वनविभाग, भूमीअभिलेख आणि श्रीरामपूर नगरपरिषद कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते.यावेळी जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया सदर जागेची स्थळनिश्चिती करणे करिता अधिकाऱ्यांना समक्ष पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्या अनुषंगाने आज आ. हेमंत ओगले यांनी अधिकाऱ्यांसमवेत पाहणी केली. यावेळी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, वनविभागाचे निलेश रोडे, भूमी अभिलेख कार्यालयाचे खरोटे, नगररचना विभागाच्या सुचिता शिंदे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सदर स्मारकाची जागा वन विभागाची असून वन विभागाने तातडीने भूमी अभिलेख कार्यालयाकडे जागा निश्चितीचा अहवाल सादर करावा. जेणेकरून पुढील कार्यवाही करणे सोयीचे होणार असून  यामुळे सदर स्मारकाला जवळपास अडीच गुंठे इतकी जागा मिळणार आहे.डॉ. बाबसाहेब आंबेडकर यांचे भव्य दिव्य स्मारक तयार होऊन पूर्णकृती पुतळा साकारणार असल्याचे आ. ओगले यांनी म्हटले.यावेळी भीमशक्तीचे संदीप मगर, माजी सरपंच सुनील शिरसाठ, काँग्रेसचे शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक राजू चक्रनारायण, माजी नगरसेवक रितेश रोटे, राजेंद्र सोनवणे,के.सी शेळके, अशोकभाई बागुल, प्रवीण नवले, सुनील मगर, सुहास राठोड, रितेश एडके, वैभव पंडित, किरण खंडागळे, मोहन आव्हाड, सुरेश जगताप, मनोज काळे, अंतोन शेळके, सोमनाथ पटाईत, आसाराम पोटभरे, आकाश शेटे, मच्छिंद्र ढोकणे, सचिन राठोड, पी जी सावंत, इंगळे साहेब, मस्के साहेब, रियाज खान पठाण, अमोल आवटी, संजय गोसावी, राजेश जोंधळे, सागर दुपाटी यांच्यासह आदी उपस्थित होते.

  डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्याच्या जागेची अधिकाऱ्यांसमवेत आ.हेमंत ओगले यांनी पाहणी केली.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!