ॲट्रॉसिटी गुन्ह्याबाबतच्या संपूर्ण घटनाक्रमाची चौकशी करा;दिपाली व प्रतिक चित्ते यांची मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूरमधील भाजपाचे हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश चित्ते यांच्या सुविद्य...

श्रीरामपूर-
श्रीरामपूरमधील भाजपाचे हिंदुत्ववादी नेते प्रकाश चित्ते यांच्या विरोधात काही दिवसांपूर्वी ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलाआहे. या पार्श्वभूमीवर प्रकाश चित्ते यांच्या सुविद्य पत्नी सौ. दिपाली चित्ते व प्रतिक चित्ते यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेतली.संपूर्ण घटनाक्रमाची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कडे केली.यावेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिले की, संबंधित फिर्यादीने रात्री पावणेआठ वाजता दिलेल्या एका फिर्यादीमध्ये ना प्रकाश चित्ते यांचे नाव होते, ना जातीयवाचक शब्दांचा उल्लेख होता. मात्र, त्यानंतर रात्री एक वाजता पुन्हा दाखल करण्यात आलेल्या दुसऱ्या फिर्यादीत आठ-दहा दिवसांपूर्वीच्या काल्पनिक घटनांचा उल्लेख करून जातीय शिवीगाळ झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.पोलिसांनी कुठलीही प्राथमिक चौकशी किंवा शहानिशा न करता तातडीने ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारातून प्रशासनावर राजकीय दबाव होता तसेच यामागे मोठे कटकारस्थान होते हे स्पष्ट होते,असे सौ. दिपाली चित्ते व प्रतिक चित्ते यांनी सांगितले.त्यांनी या संपूर्ण प्रकरणाची वस्तुनिष्ठ आणि निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. जेणेकरून सत्य जनतेसमोर येईल अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.

प्रकाश चित्ते यांच्या पत्नी दिपाली चित्ते व प्रतिक चित्ते यांनी मुख्यमंत्री व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांना निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!