शनीदेवगाव सप्ताहाचा पहिल्याच दिवशी विक्रम;लाखो भाविकांची हजेरी;सप्ताहस्थळी पुरणपोळीचा घेतला आस्वाद

श्रीरामपूर-नितीन शेळकेयोगीराज सद्‌गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने...

श्रीरामपूर-नितीन शेळके
योगीराज सद्‌गुरू श्री गंगागिरीजी महाराज यांच्या १७८ व्या अखंड हरिनाम सप्ताहास आज  मठाधिपती गुरुवर्य महंत स्वामी रामगिरीजी महाराज यांच्या मिरवणुकीने व शोभायात्रेने उत्साहात प्रारंभ झाला.टाळ-मृदुंगाच्या गजरात, जयघोषात आणि विविध रंगीबेरंगी चित्ररथांच्या साथीत ही मिरवणूक सप्ताहस्थळी पोहोचली.या सप्ताहाने पहिल्याच दिवशी गर्दीचा विक्रम केला.आज सुमारे 2-2.5 लाखांहून अधिक भाविक हरिनामात तल्लीन होऊन सप्ताहात सहभागी झाल्याचा आयोजकांचा दावा आहे.गोदावरी नदीच्या काठावर भक्तीमय व नयनरम्य वातावरणात लाखो भाविकांनी पगंतीत मांडे पुरणपोळी महाप्रसादाचा आनंद घेतला. येवला, नांदगाव तालुक्यासह  संगमनेर, राहुरी,श्रीरामपूर,नेवासा , गंगापूर, वैजापूर आदी तालुक्यातील ६२ गावांनी पुरणपोळी,व मांडे तर लक्ष्मीमाता मिल्कचे  बाबासाहेब चिडे व मित्रमंडळाच्यावतीने १५ हजार लीटर दुध असा महाप्रसाद पुरवठा केला. या पहिल्या दिवसाचे सप्ताह स़ोहळयास  अविनाश पाटील गलांडे,  भाजपा तालुकाध्यक्ष  बाबासाहेब चिडे,  नागेबाबा परिवाराचे प्रवर्तक कडुभाऊ काळे, कापसे पैठणीचे बाळासाहेब कापसे,माजी सभापती वंदनाताई मुरकुटे, ज्ञानेश्वर मुरकुटे,अश़ोकचे संचालक निरज मुरकुटे, डॉ प्रकाश शेळके, अशोक बोऱ्हाडे, सतीष आसने,राधाकृष्ण बोरकर, ज्ञानेश्वर सोडणार,पंकज ठोंबरे,प्रवीण पवार, पवन चव्हाण, गणेश तांबे,बद्रीआण्णा चव्हाण,सतीष शिंदे, भिमाशंकर तांबे, तात्यासाहेब नवले,भारत पवार, योगेश पवार,  संत बहिरा जातवेद संस्थानचे  विश्वनाथगिरी महाराज,बेटाचे विश्वस्त मधुकर महाराज,किशोर थोरात , दत्तात्रय खपके, चंद्रकांत महाराज सावंत, रामभाऊ महाराज नादीकर, बाळासाहेब महाराज रंजाळे, ज्ञानेश्वर महाराज गुंजाळ, संदिप महाराज बनसोडे भगवान महाराज शास्त्री, नवनाथ महाराज आंधळे  आदि उपस्थित होते. या सोहळ्यास विरगांव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शंकर वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा अधिकारी व ३१० पोलीस कर्मचारी सप्ताहास तैनात करण्यात आले आहे.एस डी आर एफ जवान दोन प्रमुख अधिकारी व चाळीस कर्मचारीही तैनात करण्यात आले आहे.सप्ताहाच्या इतिहासात प्रथमच प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

शनी देवगाव सप्ताहाने पहिल्याच दिवशी गर्दीचा विक्रम केला.आज सुमारे 2-2.5 लाखांहून अधिक भाविक हरिनामात तल्लीन होऊन सप्ताहात सहभागी झाले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!