श्रीरामपूर-
सध्या कांद्याचे भाव पडलेले असल्याने कांदा उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे.कांद्याच्या भाववाढीसाठी तात्काळ उपाययोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करण्याचा निर्णय घ्यावा अशी मागणी छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,राहुरीचे तालुकाध्यक्ष अमोल वाळुंज यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी कांदा दर वाढत नसल्याने तसेच साठवणुकीत कांद्याला कोंब येऊन तो सडू लागल्याने प्रचंड मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.त्यामुळे आपण सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून कांदा भाववाढीसाठी उपयोजना करून नाफेड मार्फत 25 रु. प्रति किलो दराने कांदा खरेदी करावा आणि शेतकऱ्यांना आधार द्यावा.बाजारसमितीमध्ये ही खरेदी न करता थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या एकूण कांद्यापैकी 60 टक्के कांदा जागेवर खरेदी करावा.नाफेडने चालू बाजार भावने खरेदी केल्यास शेतकऱ्यांना फायदा होणार नाही.बाजारसमिती मध्ये खरेदी केल्यास व्यापारी आपला मला नाफेडला देतील. त्यातही शेतकऱ्यांना काहीही पदरात पडत नाही. म्हणून कांदा थेट शेतकऱ्याकडून साठवलेल्या चाळीतून कृषी विभागाच्या मदतीने खरेदी करावा. तसेच कांदा निर्यातवाढ होण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव सादर करून राज्य सरकार मार्फत प्रयत्न करावेत.राज्यातील जास्तीत जास्त कांदा कसा निर्यात होईल यासाठी प्रयत्न करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी अखिल भारतीय छावा संघटनेचे जिल्हाध्यक्ष नितीन पटारे,तालुकाध्यक्ष राहुरी अमोल वाळूज,अक्षय पटारे, गोवर्धन गोरे, राजेंद्र भिंगारे, बाबासाहेब भणगे यांनी केली आहे.
