डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला त्र्यंबकेश्वर येथे जाऊन अभिवादन;भीमअनुयायांकडून भीमस्तुती पठण;श्रीरामपुरात लवकरच बसवणार पुतळा

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात लवकरच सन्मानपूर्वक उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला गुरुवार दिनांक २४ जुलै रोजी पुष्पहार अर्पण...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहरात लवकरच सन्मानपूर्वक उभारण्यात येणाऱ्या भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला गुरुवार दिनांक २४ जुलै रोजी पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. नाशिक त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध मूर्तिकार शरद मैद यांनी या भव्य ब्रांझ धातूच्या पुतळ्याची निर्मिती केली असून, हा पुतळा लवकरच श्रीरामपूर शहरात उभारण्यात येणार आहे.महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्या समवेत फोटो व पहिल्यांदाच पुष्पहार अर्पण केल्यामुळे भीमअनुयायांचा आनंद गगनात मावला नाही. यावेळी भारतरत्न महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा स्मारक समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे विभागीय जिल्हा प्रमुख भीमराज बागुल तसेच माजी नगरसेवक प्रकाश ढोकणे जय भीम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राह्मणे, वंचितचे तालुकाध्यक्ष चरण त्रिभुवन, रिपाईचे तालुका संघटक संजय बोरगे, पीपल्स रिपब्लिकन चे तालुका अध्यक्ष संतोष मोकळ, रिपाईचे युवक शहराध्यक्ष विशाल सुरडकर, वंचित चे किशोर ठोकळ बहुजन क्रांती सेनेचे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल काळे, रिपाईचे प्रदीप गायकवाड,बहुजन टायगर फोर चे अध्यक्ष संजय रूपटक्के, समता सैनिक  दलाचे दादासाहेब बनकर आदी उपस्थित होते. उपस्थितांच्या वतीने सामूहिक भीमस्तुती पठण करण्यात आली. तसेच त्र्यंबकेश्वर येथील प्रसिद्ध मूर्तिकार  मैद  यांचा समितीचे अध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी हार घालून सत्कार केला. तसेच भारतरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा श्रीरामपूरला नेण्यासंदर्भात सखोल चर्चा झाली.या ऐतिहासिक क्षणी भिमानुयायांमध्ये आनंदाचे उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. पुतळ्याच्या स्थापनेची प्रतीक्षा करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे.श्रीरामपूर शहरामध्ये महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा पूर्णाकृती पुतळा लवकरच उभारण्यात येणार असून, श्रीरामपूर शहराच्या वैभवात भर पडणार आहे. या स्मारकामुळे सामाजिक न्याय व बंधुतेचा संदेश पुन्हा एकदा अधोरेखित होणार आहे.

भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे जाऊन भीम अनुयायांनी अभिवादन केले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!