योजनांच्‍या अंमलबजावणीत जिल्‍हा राज्‍यात अग्रस्‍थानी-पालकमंत्री विखे पाटील;नव्‍याने रुजु झालेले आणि बदलून गेलेल्‍या आधि‍का-यांचा सन्‍मान सोहळा

श्रीरामपूर-योजनांच्‍या अंमलबजावणीत अहिल्‍यानगर जिल्‍हा राज्‍यात अग्रस्‍थानी राहीला.भविष्‍यातही जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेचा वेग कायम राहण्‍यासाठी सुसंवादाने अधिक चांगले काम करण्‍याची अपेक्षा जिल्‍ह्याच्‍या विकासाचे...

श्रीरामपूर-
योजनांच्‍या अंमलबजावणीत अहिल्‍यानगर जिल्‍हा राज्‍यात अग्रस्‍थानी राहीला.भविष्‍यातही जिल्‍ह्याच्‍या विकास प्रक्रीयेचा वेग कायम राहण्‍यासाठी सुसंवादाने अधिक चांगले काम करण्‍याची अपेक्षा जिल्‍ह्याच्‍या विकासाचे व्‍हीजन डॉक्‍युमेंट तयार करण्‍याचे आवाहन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केले.अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये नव्‍याने रुजु झालेले तसेच बदलून गेलेल्‍या आधि‍का-यांचा सन्‍मान सोहळा मंत्री विखे पाटील यांच्‍या प्रमुख उपस्थितीत संपन्‍न झाला. या निमित्‍ताने आयोजित केलेल्‍या स्‍नेहसंवाद मेळाव्‍यात त्‍यांनी जिल्‍ह्यात विकास प्रक्रीयेची सुरु असलेली वाटचाल तसेच अगामी काळात जिल्‍ह्याच्या विकासाचे उदिष्‍ठ पुर्ण करण्‍यासाठी कराव्‍या लागणा-या निर्णयांची माहीती त्‍यांनी दिली.या प्रसंगी आ.विठ्ठलराव लंघे,आ.विक्रमसिंह पाचपुते, साखर आयुक्त सिध्दराम सालीमठ, जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, अतिरीक्त पोलीस अधिक्षक सोमनाथ वाकचौरे, आयुक्त यशवंत डांगे, शिर्डी साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षनाथ गाडीलकर यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. मंत्री विखे पाटील पुढे म्‍हणाले की, शासन आपल्‍या दारी उपक्रमातून सुमारे २५ लाख लाभार्थ्‍यांना विविध शासकीय दाखले देता आले. लाडकी बहीण योजनेची सुमारे १३ लाख महिलांनी केलेली नोंदणी, घरकुल योजनेची यशस्‍वी अंमलबजावणी यांसह अन्‍य विभागांनीही त्‍यांच्या स्‍तरावर केलेल्‍या यशस्‍वी कामगिरीमुळे राज्‍यात अहिल्‍यानगर जिल्‍हा अग्रेसर राहीला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्‍या उपस्थितीत निळवंडे धरणाचे लोकार्पण आणि शासन आपल्‍या दारी उपक्रमाच्‍या समारोप कार्यक्रमाची आठवण सांगताना मंत्री विखे पाटील म्‍हणाले की, त्‍याच दिवशी राज्‍यात आरक्षणाच्‍या मागणीवरुन आंदोलने सुरु होती. या तणावाच्‍या परिस्थितीत कार्यक्रम कसा होणार असा प्रश्‍न सर्वांच्‍याच समोर होता. परंतू आधिका-यांचे सहकार्य आणि नागरीकांनी दाखविलेल्‍या उपस्थितीमुळे हा ऐतिहासिक कार्यक्रम होवू शकला,असे ना. विखे पाटील म्हणाले.याप्रसंगी जिल्‍हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी सध्‍या जिल्‍ह्यात प्रशासनाकडून सुरु असलेल्‍या विकास कामांबाबत माहीती दिली. साखर आयुक्‍त सिध्‍दराम सालीमठ यांनी मंत्री विखे पाटील यांच्‍या प्रशासनाशी असलेल्‍या सुसंवादाचे कौतूक करुन, या जिल्‍ह्यामध्‍ये विकासाच्‍या खुप संधी आहेत. विकासाचा विचार करुन, काम करणारे नेतृत्‍व आहे.माझ्या ३२ वर्षाच्या प्रशासकीय सेवेत अनेक जिल्ह्यात काम केले पण असा अधिकारी वर्गाचा सन्मान प्रथमच अनुभवता आला. विखे पाटील परिवाराच्‍या वतीने सर्व आधिका-यांचा सन्‍मान करण्‍यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अहिल्‍यानगर जिल्‍ह्यामध्‍ये नव्‍याने रुजु झालेले तसेच बदलून गेलेल्‍या आधि‍का-यांचा सन्‍मान सोहळ्यात मार्गदर्शन करताना पालकमंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!