श्रीरामपूर-
दर्जेदार शैक्षणिक संधी आपल्या ग्रामीण भागात उपलब्ध करण्यासाठी ‘अशोक’ कायम प्रयत्नशील आहे. नावारूपास आलेली ही संस्था पदवीचे परिपूर्ण शिक्षण देण्यास तत्पर असल्याचे समाधान वाटते, असे प्रतिपादन माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांनी केले.
अशोक सहकारी साखर कारखाना संचलित अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेच्या अशोक इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी (अभियांत्रिकी पदवी) चा उद्घाटन समारंभ माजी आ. भाऊसाहेब कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली व अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या शुभहस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाले.यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून श्रीरामपूर नगरपरिषदेचे माजी उपनराध्यक्ष संजय छल्लारे, अशोक ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष कोंडीराम उंडे, अशोक कारखान्याचे विद्यमान व्हा. चेअरमन बाबासाहेब आदिक, माजी व्हा. चेअरमन हिम्मतराव धुमाळ, माजी चेअरमन सुरेश गलांडे, ज्येष्ठ संचालक रावसाहेब थोरात, माजी चेअरमन ज्ञानदेव साळुंके, कार्यकारी अधिकारी सौ. मंजुश्रीताई मुरकुटे, संचालक ज्ञानेश्वर काळे, प्रफुल्ल दांगट, ज्ञानेश्वर शिंदे, आदिनाथ झुराळे, माजी संचालक काशिनाथ गोराणे आदींसह अनेक मान्यवर उपस्थित होते.अध्यक्षीय भाषणात माजी आ.श्री. कांबळे पुढे म्हणाले की, बदलत्या काळाची आव्हाने लक्षात घेता शैक्षणिक परंपरेला तांत्रिक व्यवसायिक शिक्षणाची जोड देण्याकरीता संस्थेचे संस्थापक भानुदास मुरकुटे यांनी या अशोक कारखान्यामार्फत शैक्षणिक संकुलाची उभारणी केली आहे. याप्रसंगी श्री. छल्लारे यांनी सांगितले की, चांगले दर्जाचे उच्च शिक्षण, तंत्र शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठीच्या प्रयत्नांमध्ये श्री. मुरकुटे यांनी कोणतीही कसर सोडली नाही. ज्यामुळे तांत्रिक शिक्षणाच्या दर्जा सुधारण्यात झालेली फलनिष्पत्ती दिसून येते.माजी आ.श्री.मुरकुटे म्हणाले की, तांत्रिक शिक्षण हा पदविका आणि पदवी अभ्यासक्रम हे माध्यम शिक्षणाच्या प्रवाहातील बहुस्वीकृत मार्ग आहे. या अशोकच्या संस्थामध्ये पायाभूत सुविधा, मूलभूत शिक्षण, व्यावसायिक ज्ञान व उच्च स्तरावर विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मार्फत रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, भविष्यात पात्र व सक्षम अभियंते निर्माण करणे हे अशोकचे उद्दिष्ट आहे. कार्यक्रमाचे स्वागत संस्थेचे सहसचिव विरेश गलांडे यांनी केले. या कार्यक्रमास सिद्धार्थ मुरकुटे, दत्तात्रय नाईक, संचालक ज्ञानदेव पटारे, रामभाऊ कसार, अमोल कोकणे, निरज मुरकुटे, अच्युतराव बडाख, मयूर पटारे, आदींसह पालक, सभासद, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.आभार डॉ. मोहितकुमार गायकवाड यांनी मानले. सूत्रसंचालन अरुण कडू व दिलीप खंडागळे यांनी केले. कार्यक्रमास पॉलिटेक्निकचे सर्व विभाग प्रमुख, शिक्षक व विद्यार्थी शिक्षकेतर कर्मचारी आदींनी विशेष परिश्रम घेतले.
