श्रीरामपूर-
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन श्रीरामपूर मतदार संघातील ८२ गावे व २ नगरपालिका हददीत राष्ट्रवादी काँग्रेसचे १०० शाखा फलक लावण्याचा संकल्प केला होता. आज ग्रामीण भागातील बहुतांशी गावामधे या फलकांचे अनावरण करण्यात आले.राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष गावपातळीवर अधिक बळकट करण्याचा उद्देश त्यात असल्याचे मा. आ.लहू कानडे यांनी सांगितले.कानडे पुढे म्हणाले की,या उपक्रमामुळे श्रीरामपूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटनात्मक बळ वाढणार आहे. आगामी निवडणुकांसाठी मजबूत पायाभरणी या माध्यमातून करण्यात येत आहे. कार्यक्रमाचे आयोजन शिस्तबद्ध आणि उत्साही वातावरणात पार पडले. अनेक युवक कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला भगिंनी आणि ग्रामस्थांनी या उपक्रमाला मोठा प्रतिसाद दिला.

या उपक्रमाचे उद्दिष्ट गावपातळीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटन बळकट करणे हे असून, प्रत्येक गावात स्थानिक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हे फलक अनावरण सोहळे पार पडले.आज बेलापूर, पढेगाव, टाकळीभान,महाकाळ वाडगाव, घुमनदेव, माळेवाडी, खंडाळा, नर्सरी, कान्हेगाव, उंदीरगाव, कारेगाव वगैंरे ठिकाणी शाखा फलकांचे अनावरण करण्यात आले. यावेळी सदर गावातील कार्यक्रमाला पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला भगिंनी व ग्रामस्थांची उपस्थिती व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.या प्रसंगी राष्ट्रवादी कॉंग्रेस प्रदेश सरचिटणीस अरुण पा. नाईक, जिल्हाकार्याध्यक्ष माजी नगरसेवक अशोक कानडे, अक्षय नाईक,सचिन जगताप, सतीश बोर्डे, राजेंद्र कोकणे, दीपक कदम, कार्लस साठे, अक्षय नाईक, चांगदेव देवराय, अजिंक्य उंडे, आशिष शिंदे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते.