पत्ते खेळणारे कृषी मंत्री कोकाटेंची हकालपट्टी करा;राष्ट्रवादीच्या गुंडांवर कारवाईसाठी छावा संघटनेचे निवेदन

श्रीरामपूर-विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी करावी तसेच लातूर येथील छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर...

श्रीरामपूर-
विधिमंडळात पत्ते खेळणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांची हकालपट्टी करावी तसेच लातूर येथील छावाच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करावे या मागणीसाठी जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली आज छावा संघटनेने श्रीरंप उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन सदर घटनेचा निषेध केला आहे.यावेळी देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, लातूर येथे राष्ट्रवादी प्रदेशअध्यक्ष यांना निवेदन देण्यासाठी जमलेल्या अखिल भारतीय छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक चा सुरज चव्हाण व त्याच्या साथीदारांना अटक करून त्यांच्यावर संघटित गुन्हेगारी (मोकोका) कायद्या अंतर्गत कारवाई करावी.तसेच कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेऊन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कायम मानहानीकारक वक्तव्य करणाऱ्या या कोकाटे ची मानसिक स्थिती तपासावी आणि आरामासाठी त्यांना पत्ते खेळण्यासाठी मंत्रालयात स्वतंत्र केबिन बनून द्यावी,
निवेदनावर नितीन पटारे पाटील (जिल्हाध्यक्ष) यांच्यासह शरद बोंबले पाटील (शहर अध्यक्ष) अक्षय पटारे, गोरख शेजुळ, राजू भिंगारे, निलेश बनकर, भाऊ गुंजाळ, प्रदीप पटारे, विजय सालालकर, बाबासाहेब भनगे, राहुल तारख, मयुर पटारे, दादा शेजुळ, रोहन पटारे, दिलीप भागडे, अमोल शितोळे , विशाल पटारे, सतीश बेल्हेकर, रोहित उंडे, विकास उंडे आदींची नावे आहेत. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनाही निवेदनाच्या प्रती पाठविण्यात आल्या आहेत.

जिल्हाध्यक्ष नितीन पटारे यांच्या नेतृत्वाखाली आज छावा संघटनेने श्रीरामपूर उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!