श्रीरामपूर येथे भाजपचे ‘महा रक्तदान संकल्प’ शिबीर;115 जणांनी रक्तदान करत नोंदवला सहभाग

श्रीरामपूर-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुका यांच्या वतीने श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय येथे...

श्रीरामपूर-
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुका यांच्या वतीने श्रीरामपूर शहरातील नगरपालिकेच्या लोकमान्य टिळक वाचनालय येथे ‘महा रक्तदान संकल्प’ शिबिर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.या रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यात —- रक्तदात्यांनी आपला सहभाग नोंदवत रक्तदान केले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त अनावश्यक खर्चाला फाटा देऊन सामाजिक उपक्रम राबवून त्यांना अनोख्या पद्धतीने यावेळी शुभेच्छा देण्यात आल्या.आज दि.22 रोजी सकाळी 10 वा या रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांच्या हस्ते संपन्न झाले.सकाळपासून शिबिरात महिला आणि पुरुषांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.शिबिरात अनेक माजी सैनिक व पोलीस कर्मचाऱ्यांनी देखील सहभाग नोंदवत या सामाजिक उपक्रमास पाठिंबा दिला.भाजपच्या वतीने राबविण्यात आलेल्या या रक्तदान शिबिराच्या सामाजिक उपक्रमाचे श्रीरामपूरकरांनी कौतुक केले आहे.यावेळी पक्षाच्या तालुका व शहरच्या अनेक पदाधिकाऱ्यांसह भाजपाचे ज्येष्ठ नेते रामभाऊ तरस व भागचंद नवगिरे यांनी देखील रक्तदान केले. याप्रसंगी तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड,नानासाहेब पवार, मारुती बिंगले, संजय फंड, बंडूकुमार शिंदे, सतीश सौदागर,शरद नवले,अभिषेक खंडागळे,दीपक चव्हाण, श्रीनिवास बिहानी, आशिष धनवटे,संजय गांगड, वैशालीताई चव्हाण,अक्षय गाडेकर, श्रेयस जिरंगे, महेश सूळ, अनिकेत भुसे,सोमनाथ गांगड, मनोज लबडे, नितीन शेळके,भैरव कांगुणे, विजय आखाडे, विशाल अंभोरे,रुपेश हरकल,मंजुश्री ढोकचैळे,पूजा चव्हाण,पुष्पलता हरदास, गिरीधर आसणे, डॉ.शंकर मुठे, किशोर बनसोडे,रामभाऊ तरस, नारायण काळे,शिवनाथ आव्हाड,केतन खोरे,रवी पाटील, महेंद्र पटारे, दिलीप त्रिभुवन, अनिल भनगडे, आनंद चावरे, रामराव शेटे,अनिल भानगडे, राहुल पांढरे, भैय्या भिसे, गौतम उपाध्ये,सुप्रिया धुमाळ, योगेश ओझा, प्रतीक वैद्य, सुबोध शेवतेकर, तेजस उंडे, ऋषिकेश सुरडकर, रवी पंडित, मनीष कुलकर्णी, श्रेयस सुवर्णपाटकी, अमोल भोसले, संदीप भोसले, मंदार पावशे, महेश जोशी,आकाश दुबेया, अमोल शेटे, रवींद्र तुपे, साजिद शेख, आसीफबाई पोपटिया, पप्पू थोरात, प्रताप पठारे, विजय सदाफळ, सुनील ढोकचोळे, राजेंद्र जराड,अरुण काळे आदींसह मोठ्या संख्येने तालुका तसेच शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी श्रीरामपूर शहर व तालुका यांच्या वतीने 
‘महा रक्तदान संकल्प’ शिबिर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!