शिर्डी विमानतळाचे विस्तारिकरण अत्यंत महत्त्वाचा टप्पा-ना. विखे पाटील;विमानतळाच्या विकासकामांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत बैठक

श्रीरामपूर-शिर्डी विमानतळाचा विस्तार हा शिर्डी आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.याचा फायदा जसा शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांनाभाविकांना होणार आहे, तसाच तो...

श्रीरामपूर-
शिर्डी विमानतळाचा विस्तार हा शिर्डी आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे.याचा फायदा जसा शिर्डीत येणाऱ्या साई भक्तांनाभाविकांना होणार आहे, तसाच तो व्यापारी आणि कृषी क्षेत्रालाही होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.याबाबत सविस्तर माहिती देताना ना. राधाकृष्ण विखे पाटील बोलत होते. या बैठकीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांचीही उपस्थिती होती.

शिर्डी विमानतळाच्या विस्तारित विकासकामांचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत घेण्यात आला.यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार,
ना.राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते.

ना. विखे पाटील पुढे म्हणाले की,शिर्डी विमानतळावर अत्याधुनिक आणि अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यासाठी आपले प्रयत्न सुरु असून काही कामे प्रगतीपथावर आहेत. तर काही कामे प्रस्तावित आहेत. या सर्व बाबींचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सविस्तर आढावा घेतला आणि संबंधित विभागांना व अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना व निर्देश देण्यात आले.शिर्डी विमानतळाचा विस्तार हा शिर्डी आणि परिसरासाठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा असून शिर्डीची हवाई कनेक्टिविटी आणखी मजबूत होणार आहे. याचा फायदा जसा शिर्डीत येणाऱ्या भाविकांना होणार आहे, तसाच तो व्यापारी आणि कृषी क्षेत्रालाही होणार आहे. म्हणूनच आपण विमानतळाच्या विस्तारासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहोत, असेही ना. विखे पाटील यांनी सांगितले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!