आकारी पडित शेतकऱ्यांच्याजमीनी पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी मान्‍यता द्या;ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या नेतृत्‍वाखालील शिष्‍टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट

श्रीरामपूर-
खंडकरी शेतक-यांप्रमाणेच आकारी पडित शेतकऱ्यांच्या
हरेगाव मळ्यातील जमीनी शेतक-यांना पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी मान्‍यता देण्‍याची विनंती शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने महाम‍हीम राज्‍यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन् यांना केली. जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या नेतृत्‍वाखाली शेतक-यांच्‍या शिष्‍टमंडळाने राजभवन येथे त्‍यांची भेट घेतली.आकारी पडित शेतकऱ्याच्या शिष्टमंडळाने राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या बराबेर सविस्तर चर्चा केली.
या जमीनी शेतक-यांना पुन्‍हा मिळाव्‍यात यासाठी तत्‍कालिन महसूल मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्‍या पाठपुराव्‍यातून महायुती सरकारने विधानसभा निवडणूकी पुर्वी मंत्रीमंडळात निर्णय घेवून, या संदर्भातील कायद्याच्‍या सुधारणेला दिनांक २३ सप्‍टेंबर २०२४ रोजी मान्‍यता दिली होती. मंत्रीमंडळाच्‍या मान्‍यतेनंतर कायद्यातील सुधारणेचा अध्‍यादेश मा.राज्‍यपालांच्‍या मान्‍यतेसाठी पाठविण्‍यात आला होता. परंतू १५ ऑक्‍टोंबर २०२४ पासून विधानसभा निवडणूकीची आचारसंहिता लागल्‍यामुळे या अध्‍यादेशाला मान्‍यता मिळू शकलेली नव्‍हती.
या संदर्भात जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी  मुख्‍यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस तसेच महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे यांच्‍याकडेही सातत्‍याने पाठपुरावा सुरु ठेवला होता. त्‍यानुसार जलसंपदा मंत्री ना.विखे पाटील यांच्‍या नेतृत्‍वाखाली शेतक-यांच्‍या शिष्‍टमंडळाने राजभवनात राज्‍यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन् यांची भेट घेवून  मान्‍यता देण्‍याची विनंती केली. सन १९१८ साली तेव्‍हाच्‍या नेवासा तालुक्‍यातील ३ गावे व कोपरगाव तालुक्‍यातील ६ गावे आणि सध्‍याच्‍या श्रीरामपूर तालुक्‍यातील ९ गावांमधील ७ हजार ३७७ एकर जमीन इंग्रज शाससनाने ताब्‍यात घेवून १९३४ साली या गावातील ताब्‍यात घेतलेल्‍या  क्षेत्राला महसूल गावांचा दर्जा दिला होता. सन २०१२ साली इंग्रज सरकारने ताब्‍यात घेतलेल्‍या जमीनी खंडकरी शेतक-यांना परत करण्‍याचा ऐतिहासिक निर्णय झाला मात्र हरेगाव मळ्यातील जमीनी त्‍याच पध्‍दतीने पुन्‍हा मिळाव्‍यात म्‍हणून वेळोवेळी सादर करण्‍यात आलेले प्रस्‍ताव १९१८ रोजी राजपत्रात असलेल्‍या तरतुदीमुळे फेटाळण्‍यात येत होते.हीच बाब विचारात घेवून खंडकरी शेतक-यांप्रमाणे हरेगाव मळ्यातील शेतक-यांना जमीन वाटप करता येईल किंवा कसे याबाबत राज्‍याचे महाअधिवक्‍ता यांचे अभिप्राय घेवून महायुती सरकारने न्‍यायालयात सुध्‍दा वेळोवेळी आपली बाजू मांडली होती.आज राज्यपाल यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने त्यांना जमीन वाटपासाठी मान्यता द्यावी अशी विनंती केली आहे.यावेळी नामदार डॉ राधाकृष्ण विखे पाटील यांच्या समवेत शेतकरी संघटनेचे नेते
ॲड.अजित काळे,याचिकाकर्ते गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे,भाजपचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,डॉ शंकरराव मुठे,गोविंद वाघ, बाळासाहेब बकाल,शरद आसने, संपतराव मुठे, डॉ.दादासाहेब आदिक, सचिन वेताळ,सोपान नाईक,सुनिल आसने, बबनराव नाईक, बाबासाहेब वेताळ आदीसह अधिकारी सचिव उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्‍ण विखे पाटील यांच्या नेतृत्‍वाखाली आकारी पडीत शेतक-यांच्‍या शिष्‍टमंडळाने राजभवन येथे राज्यपाल डॉ.सी.पी राधाकृष्‍णन यांची भेट घेतली.

Leave a Comment

संबंधित बातम्या

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

Latest News

Trending News