प्रकाश चित्ते यांच्यावर महिलेच्या तक्रारीवरून अट्रोसीटीचा गुन्हा दाखल;खोटी साक्ष द्यावी म्हणून महिलेला धमकावले;चित्तेंसह एका जणावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यातील हिंदुत्ववादी नेते तसेच भाजपचे प्रकाश चित्ते यांच्या विरोधात एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून अट्रोसीटीसह विविध कलमाअंतर्गत श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.चित्ते यांच्यासह रिजवान कुरेशी या अन्य एका जणाविरुद्ध हा गुन्हा दाखल झाल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
याबाबत पुणे येथे राहणाऱ्या महिलेने श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनमध्ये दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मी वरील ठिकाणी मोलमजुरी करुन त्यावर उदरनिर्वाह भागविते. मी मुल्ला कटर याचेविरुध्द मी
श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला गुन्हा रजि. नं.। 666/2022 नुसार अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्याची सुनावणी सध्या सेशन कोर्ट, श्रीरामपुर येथे चालु आहे. माझा सदरच्या केसच्या कामकाजाची माहिती घेण्यासाठी मला अधुन मधुन श्रीरामपुर येथे यावे लागते. साधारण 8 ते 10 दिवसापुर्वी मी माझ्या खाजगी कामासाठी श्रीरामपुर येथे आले होते. माझे कामकाज आटोपुन दुपारच्या वेळी मी पुण्याला परत जाण्यासाठी निघाले होते.श्रीरामपुर बस स्टॅन्डकडे जाण्यासाठी मी नेवासारोडचा बोगदा ओलांडुन पुढे चालत जात असताना एक पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवर श्रीरामपुर येथील मी ओळखत असलेले प्रकाश चित्ते हे माझ्या जवळ आले व मला त्यांनी थांबण्यास सांगितले. मी थांबल्यानंतर ते मला म्हणाले की, ‘तु मुल्ला कटरच्या विरुध्द साक्ष देवू नको. त्याने काहीच केले नाही, असे तु कोर्टात सांग. तो माझा कार्यकर्ता आहे. तु माझ्या सांगण्याप्रमाणे साक्ष दिली तर तुला मी 2 लाख रुपये देईल आणि माझे ऐकले नाही तर तुला कुठे संपवुन टाकील ते कळणार नाही. तु पुढच्या वेळी श्रीरामपुरला आली की, मुल्ला कटरचा भाऊ तुला भेटेल. तेव्हा तुला 50 हजार रुपये देईल. बाकी पैसे काम झाल्यावर भेटतील’,असे म्हणुन ते तेथुन निघुन गेले. त्यानंतर घाबरुन मी श्रीरामपुर बस स्टॅन्ड येथुन बस पकडुन पुण्याला निघुन गेले. घाबरुन मी याबाबत कुणालाही सांगितले नाही. दिनांक 19/07/2025 रोजी माझी वरील गुन्हयात साक्ष असल्याने दिनांक 15/07/2025 रोजी माझे केसची माहिती घेण्यासाठी मी श्रीरामपुर कोर्टात आले होते. त्याकरीता मी पुण्यावरुन बसने रात्री नेवासा फाटा येथे उतरले. तिथे मी एका लॉजवर रुम घेऊन राहीले. तेव्हा तेथे सकाळी गुन्हा दाखल केलेला आरोपी मुल्ला कटरचा भाऊ रिजवान कुरेशी आला व म्हणाला की, माझ्यासोबत गुपचुप चल.मी त्याच्या गाडीवर बसून श्रीरामपुर कोर्टात गेले. तिथे एक वकिल होते. त्या ठिकाणी त्यांनी माझे एका को-या कागदावर सही व अंगठे घेतले. त्यानंतर मी कोर्टापासुन रिक्षा भाडोत्री केली व मला बस स्टॅण्डला सोडण्यास सांगितले. मी रिक्षात बसुन श्रीरामपुर बस स्टॅण्ड येथे उतरले. तेव्हा माझ्या लक्षात आले की, मुल्ला कटरचा भाऊ रिजवान हा माझा पाठलाग करत आहे. मी रिक्षाने नेवासा रोडने जात असताना अंदाजे दुपारी 03/30 वा सुमारास रेल्वे उड्डाणपुलावर रिक्षा येताच रिजवान कुरेशी याने रिक्षा थांबवली. तो मला म्हणाला की, तु माझा भाऊ याच्या विरुध्द साक्ष दिली तर आम्ही तुला मारुन टाकू. तु जर आमच्या बाजूने साक्ष दिली तर आम्ही तुला 2 लाख रुपये देऊ. वाटल्यास लगेच आता तुला 50 हजार रुपये देतो.असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ करून माझ्या भावाच्या विरुध्द जर साक्ष दिली तर तुला मारुन टाकील अशी धमकी दिली. त्याचवेळी तिथे माझे ओळखीचा एक जण आला असता रिजवान कुरेशी तेथुन निघुन गेला. तेव्हा माझी खात्री झाली की, प्रकाश चित्ते यांच्या सांगण्यावरुनच आज रोजी रिजवान कुरेशी याने मला धमकी दिली. त्यांनतर आम्ही तक्रार देण्याकरीता श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशनला आलो, असे शेवटी फिर्यादीत म्हटले आहे. सदर महिलेच्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलिसांनी प्रकाश चित्ते व रिजवान कुरेशी यांचेविरुद्ध,
भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 -232
भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 126(2)
भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023 – 351(2)
भारतीय न्याय संहिता (बी एन एस), 2023-49
अनुसूचीत जाती आणि अनुसूचीत जमाती (अत्याचार प्रतिबंधक) अधिनियम, १९८९ -3(1)(r)(s) नुसार गुन्हा दाखल केला आहे.या गुन्ह्याचा पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पो.नि. नितीन देशमुख हे करत आहेत.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News