उंदिरगाव येथील जागेच्या वादात गलांडेंच्या बाजूनेच निकाल;अपर विभागीय आयुक्त यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश कायम ठेवला
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील गट नं.७८ व ७९ या जागेसंबंधी सुरू असलेल्या वादाबाबत नाशिकच्या अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी त्यांच्यासमोर...
श्रीरामपूर- श्रीरामपूर तालुक्यातील उंदिरगाव येथील गट नं.७८ व ७९ या जागेसंबंधी सुरू असलेल्या वादाबाबत नाशिकच्या अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांनी त्यांच्यासमोर केलेले अपील फेटाळून लावत अहिल्यानगर अपर जिल्हाधिकारी यांनी दिलेले आदेश कायम ठेवल्याचा निकाल दिला आहे. त्यामुळे सदर जागा ही नानासाहेब गलांडे यांचीच असल्याचे या निकालावरून सिद्ध झाले आहे.याबाबतची अधिक माहिती अशी की, उंदीरगाव येथील गट. नं.७८ व ७९ या जागे संबंधित २०२० पासून वाद सुरु आहे. यावरून अनेक आरोप, प्रत्यारोप करण्यात आले.अहमदनगर यांचेकडील आदेश आरटीएस अपील क्र. ३६९/२०२१ दि. ०३/०३/२०२३, नंतर विभागीय आयुक्त, नाशिक यांचे न्यायालयामध्ये आर.टी.एस. / अपील /पुनरिक्षण/७७९/२०२३ सामनेवाले यांनी अर्ज केला असता तो अर्ज ०२/०७/२०२५ रोजी फेटाळून लावत नानासाहेब गलांडे यांच्या बाजूने निकाल देण्यात आला आहे.अशोक विठ्ठल बांद्रे, विठ्ठल किसन बांद्रे, राजेंद्र पांडुरंग बांद्रे, द्वारकाबाई अंबादास शिरसागर, राजू शब्बीर मणियार, सर्व रा. उंदीरगाव या सर्वांनी नानासाहेब काशिनाथ गलांडे यांच्या विरोधात विभागीय आयुक्त, नाशिक विभाग यांच्याकडे महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ चे कलम २५७ प्रमाणे अपील केले असता या वादातील मिळकत उंदीरगाव येथील गट. नं. ७९क/१८ संबंधित श्रीरामपूर, जि. अहमदनगर येथील बाद फौजदारी वादातील फेरफार क्र ५५८६ दिनांक २०/०५/१९९५ मंजूर नोंदीचे बाबत अर्जदार यांनी विलंब क्षमापन अर्जासह उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर भाग, श्रीरामपूर यांचे न्यायालयात दाद मागितली होती. त्यानुसार प्रस्तुत न्यायालयाने आरटीएस विलंब अर्ज क्र. २४१/२०२० अन्वये कामकाज चालविण्यात येवून वादातील नोंद अव्हानीत करताना सुमारे २५ वर्ष व ७ महिन्यांच्या विलंब झाल्याने दिनांक ०९/०७/२०२१ अन्वये अर्ज नामंजूर करण्यात आला होता. सदर निर्णयावर नाराज होऊन अर्जदार यांनी या अपर विभागीय आयुक्त यांच्या न्यायालयात पुनरिक्षण अर्ज दाखल केला. या संबंधित आदेशात नमूद केले आहे की हा वाद गट. क्र. ७९ बाबत असून वादातील नोंद फेरफार क्रं. ५५८६ ही गट. क्रं. ७८ बाबत आहे. त्यामुळे उपविभागीय अधिकारी, श्रीरामपूर व अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी पारीत केलेले आदेश योग्य व कायदेशीर असल्याने अर्जदार यांचे अपील नामंजूर करत अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी पारीत केलेला निकाल कायम करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.
नानासाहेब गलांडे यांच्या कन्या योगिता गलांडे म्हस्के यांनी निकालावर प्रतिक्रिया देताना म्हटले आहे की, संघटित होवून कोणी कितीही कुणाची बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी कायदा हा सर्वश्रेष्ठ असतो हे या प्रकरणात विभागीय आयुक्त प्रवीण गेडाम व अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्या निकालावरून दिसून येते. अशा प्रकारच्या निकालामुळे न्याय प्रक्रियेबाबत लोकांमध्ये विश्वास वाढण्यास निश्चित मदत होईल.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी