श्रीरामपूर- जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या माध्यमातून विविध योजना या अस्थिव्यंग व्यक्तीसाठी सुरू आहेत. अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील...
श्रीरामपूर- जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या माध्यमातून विविध योजना या अस्थिव्यंग व्यक्तीसाठी सुरू आहेत. अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या योजना तळागाळापर्यंत पोहोचवण्याचं काम होत आहे या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन राहात्याचे तहसीलदार अमोल मोरे यांनी केले. केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय भारत सरकारच्या भारतीय कृत्रिम अंग निर्माण निगम कानपूर,एस.आर. ट्रस्ट, मध्य प्रदेश, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित, जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र, जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण विभाग अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने, एडीप योजनांतर्गत आयोजित राहाता येथे आयोजित शिबीरात मोरे बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी विवेक गुंड , तालुका आरोग्य विभाग डाॅ.संजय घोलप, ऍड.रघुनाथ बोठे, माजी नगराध्यक्ष सोपान सदाफळ कैलास सदाफळ,श्री साई श्रद्धा ग्रामीण मूक बधिर विद्यालयांचे बाळासाहेब कासार, डाॅ.यशस चुंबळे,संजय सदाफळ,भाऊसाहेब जेजुरकर, साहेबराव निथाने, जबाजी मेचे, विजय सदाफळ, सागर सदाफळ, विजय शिंदे, अंबादास गाडेकर, चंद्रभान मेहत्रे, उत्तमराव डांगे, राजेंद्र वाबळे आदीसह लाभर्थी उपस्थित होते. यावेळी बोलताना मोरे म्हणाले की मंत्री विखे पाटील आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे अध्यक्ष डाॅ.सुजय विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नामुळे ही योजना तळागाळापर्यंत पोहोचत आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळत असून त्यांना नोंदणी तपासणी आणि लगेचच साहित्य मिळत असल्यामुळे त्यांची मोठी गैरसोय आता दूर होत आहे या योजनेचा गरजूंनी लाभ घ्यावा असेही त्यांनी सांगितले.अॅड. रघुनाथ बोठे म्हणाले शिर्डी मतदार संघात आणि जिल्ह्यांमध्ये जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम हे लोकाभिमुख ठरत आहेत. विविध योजनेचा प्रचार प्रसार करत असतानाच योग्य लाभार्थ्यांपर्यंत ही योजना कशी पोहोचेल आणि या योजनेतून त्या लाभार्थ्याला दिलासा कसा मिळेल यासाठी मंत्री विखे पाटील हे कायमच प्रयत्नशील राहिले आहेत. आज जिरायत भागामध्ये पाणी पोहोचले आहेत निळवंडे गोदावरी कालव्यांचा प्रश्न ही आता मार्गी लागला आहे. प्रारंभी कासार यांनी योजनेची सविस्तर माहिती दिली. यावेळी राहाता तालुक्यातील विविध गावातील लाभार्थी उपस्थित होते.जनसेवा फाउंडेशन सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून मंत्र विखे पाटील आणि डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग संचलित मंगळवार दि.१५ जुलै रोजी साई विठ्ठला लॉन्स, चितळी रोड, राहाता येथे तर सोमवार दि.२१ जुलै रोजी श्री साई निर्माण इंग्लिश मिडीयम स्कूल, विमानतळ रोड, श्री कृष्ण नगर शिर्डी येथे करण्यात आल्याची माहीती डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फौंडेशन संचलित जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्राचे संचालक डॉ. अभिजित दिवटे यांनी दिली.
अस्थिव्यंग प्रवर्गातील दिव्यांग व्यक्तींना मोफत कृत्रिम अवयव वितरण शिबिरातून कृत्रिम हात, पाय बसविणे, कॅलिपर्स यांचे मोजमाप आणि तात्काळ मोफत जागेवर साहित्य वाटप झाल्याने या शिबिरामुळे दिव्यांग व्यक्तींच्या चेह-यावर नवचैतन्य आले.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी