ख्रिश्चन धर्म स्विकारावा म्हणून महिलेला ठार मारण्याची धमकी;श्रीरामपूरातील गंभीर प्रकार;नातेवाईकांविरोधात गुन्हा दाखल

श्रीरामपूर-ख्रिश्चन धर्म स्विकारावा म्हणून महिलेला तिच्या नणंद व सासूने शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार श्रीरामपुरात घडला आहे.तसेच या...

श्रीरामपूर-
ख्रिश्चन धर्म स्विकारावा म्हणून महिलेला तिच्या नणंद व सासूने शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी देण्याचा प्रकार श्रीरामपुरात घडला आहे.तसेच या महिलेला हिंदू धर्माची पूजा करण्यासही मज्जाव करण्यात आल्याने सदर महिलेच्या तक्रारीवरून श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीत असे म्हटले की, वैशाली मंगेश साळवे, वय ३७,रा.गोंधवणी, वॉर्ड नं. १,श्रीरामपूर माझे २००९ मध्ये मंगेश साळवे याच्यासोबत आपले ख्रिश्चन पद्धतीने लग्न झाले. लग्नाच्यावेळी पती व सासरकडील लोकांनी आपल्याला हिंदू पद्धतीने पुजाअर्चा करण्याची व हिंदू धर्मानुसार राहण्याची परवानगी दिल्याने आपण लग्न केले होते.त्यानंतर पतीही हिंदू धर्म पद्धतीने पुजाअर्चा करायचा. परंतु याचा राग आपल्या मोठ्या नणंद, लहान नणंद, त्यांचा मुलगा, सासू यांना येवून त्यांनी आमच्या घरात हिंदू धर्माची पुजा करायची नाही, देवाची मूर्ती घरात ठेवायची नाही असे बोलून भांडण केले.दोन दिवसांपूर्वी आपण नगरला भरोसा सेल येथे गेलेलो असताना आपल्या नणंद, सासू यांनी आपल्या गोंधवणी येथील घरी जाऊन घरात जबरदस्तीने घुसून घरातील संसारोपयोगी साहित्य एका टेम्पोत भरले.तसेच घरातील देवी-देवतांचे फोटो एका बॅगमध्ये भरून कोठेतरी नेल्याचे आपल्याला फोनवरून मुलाने सांगितले. वैशाली साळवे हिच्या फिर्यादीवरून संध्या सुशील गायकवाड, संगिता आनंद मोरे, शारदा साहेबराव साळवे, ऋषिकेश मोरे यांच्याविरूद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब हंडाळ हे करीत आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!