श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहराची गरज लक्षात घेवून महायुती सरकराने वाढीव पाणी पुरवठा योजनेला मंजूरी दिली आहे. १७८ कोटी रुपयांच्या निधीतून कार्यान्वित होणाऱ्या पाणी पुरवठा योजनेचे काम निर्धारीत वेळेत पूर्ण होण्याच्या दृष्टीने नियोजन करा आशा सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या.
श्रीरामपूर शहरातील विविध प्रभागां मधील विकास कामांचा शुभारंभ तसेच लोकार्पण सोहळा मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.पालिकेच्या वतीने विकसित करण्यात येत असलेल्या शहर वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामाची पाहाणी त्यांनी अधिकारी व पदाधिकारी यांच्या समवेत केली.महायुती सरकारने या योजनेच्या कामाला केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून १७८ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.२०५१ सालची लोकसंख्या गृहीत २६.३६ दक्ष लक्ष लिटर पाणी प्रतिदीन लागण्याची शक्यता गृहीत धरून योजनेचा आराखडा तयार करण्यात आला आहे.सद्य परिस्थितीत जल शुध्दीकरण केंद्राचे आर सी सी डिझाइन प्रमाणे फिल्टर बेडचे खोदकाम पूर्ण झाले असून दगडी सोलिंग व क्राॅकींटचे काम प्रगती पथावर असल्याची माहीती मुख्याधिकारी मच्छीद्र घोलप यांनी सांगितले.पाणी योजनेतील नवीन उंच जलकुंभ काम जुन्या टाकीचे बांधकाम पाडल्यानंतर हाती घेण्यात येणार असून,वितरण व्यवस्थैसाठी ५९ कि.मी.पाइप लाइनच्या कामापैकी १७ कि.मी.पूर्ण काम पूर्ण झाले असल्याचे या पाहाणी दरम्यान सांगण्यात आले.पाणी योजने करीता तलावाचे सर्वेक्षण पूर्ण करून बोअर कोअर चाचणी करण्यात आली आहे.तलावाचे खोलीकरण हे निर्धारीत वेळेत पूर्ण करून आर. सी.सी.काम करण्यात येणार आहे.तलावात आर सी सी काम पूर्ण झाल्यानंतर तळातील मातीचा थर प्लस्टिक शीट वाळूचा थर इत्यादी काम पूर्ण करण्यासाठी दोन महीन्याच्या कालावधी लागणार आहे.योजनेतील सर्व काम कोणत्याही त्रृटी राहाणार नाहीत अशा पध्दतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले.वाढीव पाणी पुरवठा योजना शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने सामाजिक भावना लक्षात घेवून योजनेचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याची काळजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत शहरातील एकूण पाच प्रभागात भूमीपूजन आणि उद्घाटनाचे कार्यक्रम संपन्न झाले.ठिकठिकाणी नागरीकांशी संवाद साधून मंत्री विखे पाटील यांनी नागरीकांच्या समस्या तसेच विकास प्रक्रीयेबाबत असलेल्या सूचना जाणून घेतल्या.भाजपाचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,मा सभापती दीपक पटारे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, माजी नगराध्यक्ष संजय फंड, केतन खोरे, नानासाहेब पवार, नानासाहेब शिंदे, शरदराव नवले, प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित होते.

चौकट–
‘शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण योजना’
योजनेतील सर्व काम कोणत्याही त्रृटी राहाणार नाहीत अशा पध्दतीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.वाढीव पाणी पुरवठा योजना शहराच्या भविष्याच्या दृष्टीने महत्वपूर्ण असल्याने सामाजिक भावना लक्षात घेवून योजनेचे काम दिलेल्या कालावधीत पूर्ण करण्याची काळजी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी घेण्याचे आवाहन मंत्री विखे पाटील यांनी केले.