श्रीरामपूर शहरात २१०० किलो गोवंशीय मांस पकडले;१० लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त; पाच जण ताब्यात;श्रीरामपूर शहर पोलीसांची कारवाई

श्रीरामपूर-
श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज दि.११ जुलै रोजी दोन शहरातील दोन ठिकाणी छापे टाकून २१०० किलो गोवंशीय मांस आणि हत्यारांसह एकूण १० लाख २१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत पाच आरोपींना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याविरोधात श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, आज दि.११ रोजी सकाळी ६ वाजता पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना गुप्त बातमीदाराकडून माहिती मिळाली की, श्रीरामपूर शहरातील विस्मील्लानगर पाटाच्या कडेला, वार्ड नं. ०२ येथील मोसीन उर्फ बुंदी इसाक कुरेशी यांच्या पत्र्याच्या शेडमध्ये आणि जैनब मस्जिदजवळ, अहिल्यादेवीनगर, चंजरंग चौक, वार्ड नं. ०२ येथील एका पत्र्याच्या शेडमध्ये गोवंशीय जनावरांची कत्तल केली जात आहे आणि हे मांस विक्रीसाठी नेले जाणार आहे.
या माहितीच्या आधारे, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी तात्काळ तपास पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पथकाने पंचांसह दोन्ही ठिकाणी छापे टाकले असता, तेथे पाच जण कत्तल केलेल्या गोवंशीय जनावरांच्या मांसाचे छोटे तुकडे करून वाहनामध्ये भरताना आणि कत्तलीसाठी वापरलेली हत्यारे घेऊन मिळून आले. यावेळी पोलिसांनी मोसीन उर्फ बुंदी इसाक कुरेशी, वय ३५ वर्षे, रा. वार्ड नं. ०२, श्रीरामपूर,शोएब सलीम कुरेशी, वय ३० वर्षे, रा. सुभेदार वस्ती, वार्ड नं. ०२, श्रीरामपूर, अरबाज अस्लम शहा, वय २३ वर्षे, रा. सुभेदार वस्ती, वार्ड नं. ०२, श्रीरामपूर,रिजवान युसुफ कुरेशी, वय ३६ वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, वार्ड नं. ०२, श्रीरामपूर, अमजद युनुस कुरेशी, वय ४४ वर्षे, रा. कुरेशी मोहल्ला, वार्ड नं. ०२, श्रीरामपूर यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून विस्मील्लानगर येथील ठिकाणाहून जप्त अंदाजे १८०० किलो गोवंशीय मांस (किंमत ३,६०,००० रुपये), दोन छोटे सुरी, एक लाकडी दांड्याची कुऱ्हाड (किंमत १००० रुपये), एक पांढऱ्या रंगाचे अशोक लेलंड कंपनीचे छोटा हत्ती वाहन (क्र. एम.एच.०४ एच.डी. ८७६२) (किंमत ६,००,००० रुपये) असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.तसेच जैनब मस्जिद जवळील ठिकाणाहून अंदाजे ३०० किलो गोवंशीय मांस (किंमत ६०,००० रुपये) दोन छोटे सुरी (किंमत ५०० रुपये)
असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकारे एकूण १० लाख २१ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकाने केली. या पथकात पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम, पोहेका राजू त्रिभुवन, पोना भैरवनाथ अडागळे, पोकॉ संपत बडे, पोकॉ अमोल पडोळे, पोकॉ संभाजी खरात, पोकॉ मच्छिंद्र कातखडे, पोकॉ अजित पटारे, पोकॉ सचिन काकडे, पोकॉ सागर बनसोडे, पोकॉ अजिनाथ आंधळे, पोकॉ धनंजय वाघमारे, पोकॉ रवींद्र शिंदे, पोकॉ अकबर पठाण आणि मपोकॉ मीरा सरग यांचा समावेश आहे.या गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक रोशन निकम हे करत आहेत.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News