श्रीरामपूर–
दत्तनगर भागातील लोकांना नागरी सुविधा उपलब्ध करा अन्यथा आठ दिवसांमध्ये आपल्या ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू या मागणीचे निवेदन ग्रामसेवक रुबाब पटेल यांना भीमशक्ती जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी दिले आहे.
यावेळी मगर म्हणाले की दत्तनगर गावातील प्रत्येक भागात रस्त्याची अतिशय दुरावस्था झाली आहे. मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत आणि सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पावसाचे पाणी खड्ड्यामध्ये पडल्याने लोकांना खड्डे दिसत नाही आणि खड्डे चुकवण्याच्या नादात अपघात होत आहे. तसेच खड्ड्यामुळे लहान मुलांना शाळेत जाण्यास सुद्धा खूप त्रास होत आहे. अनेक वेळा खड्डे बुजवण्याची मागणी केली असता ती मागणीकडे दुर्लक्ष केले आहे लाईटची खूप मोठी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे प्रत्येक भागात लाईट बंद आहे लोकांना अंधारातून जावा लागत आहे सगळीकडे कचरा साचल्याने लोकांचे आरोग्य धोक्यात आले आहे साफसफाई सुद्धा होत नाही अनेक भागात गटारी तुंबल्याने डास खूप वाढलेले आहेत. लोकांच्या आरोग्याचा प्रश्नही खूप मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाला आहे. स्मशानभूमीत शवदायिनी मागणी अनेक दिवसापासून केली असता ति पूर्ण न झाल्यामुळे तिथे अक्षरशा अंत्यविधी खाली करावा लागत आहे. तसेच सध्या घरकुलाची यादी चालू आहे परंतु काही लाभार्थीकडे अपुरे कागदपत्र असल्यामुळे त्यांची आपण नोंदणी केलेली नाही. त्यामुळे आपण सर्वांना लाभ कसा देता येईल यासाठी आपण पुन्हा लाभार्थ्याची नोंदणी करावी असे अनेक प्रकारच्या मागणीचे निवेदन त्यांना देण्यात आले. जर येत्या आठ दिवसांमध्ये लोकांच्या मागणीचा विचार न केल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर मागण्या पूर्ण करण्यासाठी तीव्र स्वरूपाचा आंदोलन करू असा इशारा शेवटी देण्यात आला यावेळी सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, सुरेश शिवलकर, विश्वास भोसले, संतोष केदारे, अश्रू बादमे,अनिल माघाडे ,तन्वीर शेख यांसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
