श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी सोमनाथ वाघचौरे;ढासळलेली कायदा-सुव्यवस्था रुळावर येण्याची सर्वसामान्यांना अपेक्षा*

श्रीरामपूर:
गुन्हे उघडकीस आणण्यात आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात विशेष कौशल्य असलेल्या व गुन्हेगारांचा कर्दनकाळ अशी ओळख असलेल्या पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांची श्रीरामपूरच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.जिल्ह्यासह श्रीरामपूरातील ढासळत चाललेल्या कायदा-सुव्यवस्थेला रुळावर आणण्याचे शिवधनुष्य वाघचौरे यांना पेलावे लागणार आहे.वाघचौरे यांचे त्यांच्या पूर्वीच्या कार्यकाळापासून श्रीरामपूरकरांशी उत्तम ट्युनिंग आहे.अहिल्यानगर जिल्ह्यातील शिर्डी, श्रीरामपूर आणि संगमनेर उपविभागांमध्ये अनेक वर्षे पोलीस उपविभागीय अधिकारी म्हणून ते कार्यरत राहिलेले आहेत.संगमनेर व शिर्डी येथे कार्यरत असताना त्यांनी अनेक गंभीर गुन्ह्यांची यशस्वी उकल केली होती.उत्तर नगर जिल्ह्यातल्या गुन्हेगारी विश्वातील घडामोडींबाबत त्यांचा अभ्यास दांडगा आहे. अनेक संवेदनशील प्रकरणे त्यांनी आपल्या मागील कार्यकाळात यशस्वीपणे हाताळली आहेत.२०२४ मध्ये त्यांची पदोन्नती होऊन राज्य राखीव पोलीस दल गट क्रमांक ५ येथे नियुक्ती झाली होती. आता पुन्हा एकदा त्यांना  श्रीरामपूर येथे पदोन्नती मिळाल्याने श्रीरामपूर शहरासह तालुक्यातील कायदा-सुव्यवस्थेचा बंदोबस्त करण्यात ते नक्की यशस्वी होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.श्रीरामपूरचे तत्कालीन अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबुर्गे यांची काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर येथे बदली झाली होती. त्यांच्या बदलीनंतर श्रीरामपूर शहरात नव्या अधिकाऱ्याची प्रतीक्षा होती, ती आता समाप्त झाली आहे.

अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे

Leave a Comment

संबंधित बातम्या

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

गरीबांना हक्काचे घर मिळवून देणे पुण्यकर्म-मा.खा. डाॅ.विखे पाटील;सावळीविहीर येथे लाभार्थीना सातबाऱ्याचे वाटप

श्रीरामपूर-शिर्डी परिसरातील सावळीविहिर बु येथील  अतिक्रमित कुटुंबांना शेती महामंडळाच्या जमिनीवर मालकी हक्काचे प्लॉट देण्याचा ऐतिहासिक निर्णय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकारामुळे प्रत्यक्ष कृतीत आला आहे. केवळ जमीनच नव्हे, तर गरिबांना

‘ऑपरेशन ऑलआऊट’ द्वारे गुन्हेगारीला लगाम;सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर पोलीसांनी राबविली मोहीम

श्रीरामपूर-आगामी कालावधीत येणाऱ्या सण उत्सवांच्या पार्श्वभूमीवर हे सण उत्सव शांततेत पार पडावे तसेच त्यादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये,यासाठी काल दि.१ ऑगस्ट रोजी रात्री श्रीरामपूर पोलीस विभागातील सर्व पोलीस स्टेशनच्या

बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड; 88 लाखांचा मुद्देमाल जप्त;पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांची माहिती

श्रीरामपूर-अहिल्यानगर जिल्ह्यातील बनावट चलनी नोटा तयार करणारे रॅकेट उघड करुन सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात अहिल्यानगर तालुका पोलीस स्टेशनच्या पथकाला यश आले आहे. आरोपींकडून तब्बल 88 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

आतंकवादाला धर्माशी जोडणे चुकीचे;भगवा आतंकवाद नसतो सिद्ध झाले-महंत रामगिरी महाराज; सप्ताहात चार लाखांहून अधिक भाविकांची उपस्थिती

श्रीरामपूर-मालेगाव बॉम्बस्फोटातील साध्वी प्रज्ञासिंह ठाकुर,कर्नल पुरोहित यांच्यासह अनेकांची न्यायालयाने पुरव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.आतंकवादी हा आतंकवादीच असतो मग तो कुठल्याही धर्माचा का असेना, परंतु त्याला एखाद्या धर्माशी जोडणे चुकीचे आहे.या प्रकरणात

Latest News

Trending News