राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना ‘बारामती हिंदू धर्मरक्षक’ पुरस्कार;ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते सन्मान

श्रीरामपूर:बारामती, इंदापूर या पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या तालुक्यांमध्ये हिंदुत्व जागवण्याचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना ‘बारामती हिंदू...

श्रीरामपूर:
बारामती, इंदापूर या पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या तालुक्यांमध्ये हिंदुत्व जागवण्याचे कार्य करणाऱ्या राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना ‘बारामती हिंदू धर्मरक्षक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
आषाढी एकादशी निमित्ताने बारामती येथे झालेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती समितीच्या वतीने अहिल्यादेवी होळकर यांचा त्रिशताब्दी जयंती कार्यक्रम बारामती नगरपरिषदे समोरील शारदा प्रांगणात मोठ्या थाटात संपन्न झाला. बारामती, भिगवण आणि इंदापूर तालुक्यातून असंख्य धनगर समाज बांधव याप्रसंगी मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
ग्रामविकास व पंचायतराज मंत्री ना. जयकुमार गोरे यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण धर्मरक्षक सागर बेग यांना करण्यात आले. पुण्यश्लोक अहिल्यादेवींची सुबक मूर्ती देऊन सागर बेग यांना यावेळी गौरवण्यात आले. याप्रसंगी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे भाषण झाले. तर इतर नियोजित कार्यक्रमामुळे जत विधानसभेचे आमदार व धनगर समाजाचा बुलंद आवाज गोपीचंद पडळकर यांना या कार्यक्रमास उपस्थित राहता आले नाही.कार्यक्रम यशस्वितेसाठी बारामती सकल हिंदू समाज व धनगर बांधव यांनी विशेष परिश्रम घेतले तर दौंड विधानाभमतदारसंघाचे आमदार राहुल कुल, पुणे कॉन्टोमेंट विधानसभा आमदार सुनील कांबळे, विधानपरिषद आमदार योगेश अण्णा टिळेकर, माळशिरसचे माजी आमदार रामभाऊ सातपुते, भाजयुमोचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनुप दादा मोरे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे राहाता तालुकाध्यक्ष मदन आप्पा मोकाटे यांची प्रमुख उपस्थिती यावेळी होती.

राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांना ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांच्या हस्ते
‘बारामती हिंदू धर्मरक्षक’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

Leave a Comment

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!