श्रीरामपूर:
वेगवेगळ्या गुन्ह्यात पोलिसांना हवे असलेले वॉरंटमधील चार आरोपी श्रीरामपूर शहर पोलिसांनी आज पहाटे ताब्यात घेतले आहेत.श्रीरामपूर शहर पोलिसांनी दमदार कारवाई करून कोंबिंग ऑपरेशन राबवून एन बी डब्ल्यू वॉरंटमधील या चौघांना आज दिनांक ७ जुलै 2025 रोजी बेलापूर दुरुक्षेत्र येथे पहाटे साडेपाच ते साडेसात वाजेच्या दरम्यान ताब्यात घेण्यात आले.या कारवाईत एन बी डब्ल्यू वॉरंट मधील सुरज मायकल रनवरे,मयूर प्रकाश खरात,विजय अशोक पवार, सागर गोकुळ बर्डे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भर पहाटेच केलेल्या कोंबिंग ऑपरेशनमुळे श्रीरामपुर तालुक्यातील फरार असलेल्या आरोपींचे आता धाबे दणाणले आहेत.
सदर कोम्बिंग ऑपरेशन पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे, पोलीस हवालदार श्री.लोढे, पोलीस अंमलदार अमोल गायकवाड, सचिन काकडे, नंदू लोखंडे, भरत तमनर, महिला पोलीस नाईक गलांडे यांनी राबवले.सदर कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे ,अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी केली.
