नवीन मराठी शाळेत विठूनामाचा गजर; चिमुकल्यांच्या बालदिंडीने वेधले श्रीरामपूरकरांचे लक्ष

श्रीरामपूर-
दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेने  आषाढी एकादशी निमित्त शनिवारी बालदिंडीचे आयोजन केले होते.या दिंडीत डोक्यावर पांढरी टोपी,पायजमा,बंडी,धोतर या पोशाखात मुले तर रंगीबेरंगी साड्या परिधान करून डोक्यावर तुळस घेऊन मुली सहभागी झाल्या होत्या. हातात भगवे ध्वज,टाळ-मृदंगाचा निनाद त्याला वीणेची साथ,’ज्ञानोबा तुकोबांचा व विठोबा रुक्माई’चा जयघोष करीत गावातून निघालेल्या दिंडीने श्रीरामपूरकरांचे लक्ष वेधले होते.”दिंडीत शाळेतील  सुमारे 1500 हुन अधिक बाल वारकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला होता. या दिंडी सोहळ्यासाठी तहान-भूक विसरून बाल वारकरी सकाळपासूनच शाळेत वारकरी वेशात मोठया उत्साहाने हजर झाले होते. शाळेतील बालवारकऱ्यांना पाहून ”विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली..” या ओळी ग्रामस्थ,पालकांच्या ओठी आपसूकच येत होत्या.शाळेतील विद्यार्थ्यांनी विठ्ठल रुक्मिणी,तुकाराम महाराज, ज्ञानेश्वर, मुक्ताई यांची आकर्षक व हुभेहुब वेशभूषा केली होती,टाळ मृदंगाच्या निनादात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष करत पालखीसह हातात विविध समाज प्रबोधनपर संदेश देत गावातून मोठी फेरी काढत ग्रामस्थांना संदेश दिला.वारीत  बालवारकरी मोठे वारकरी प्रत्यक्ष वारीत जसे उंच पताका घेऊन नृत्य करतात तसे नृत्य करत होते,स्टील पाटीतील फुगडीचे फेर धरत पंढरपुरात,दिंडीत वारकरी जसे खेळ करतात तसे हुबेहूब खेळ खेळत होते.
बालवारकऱ्यांच्य  या भक्ती रसात अवघा गाव भक्तिमय झाला होता. शाळेतील विठ्ठल-रुक्मिणीची अगदी हुबेहूब वेशभूषा केलेल्या विद्यार्थ्यांसमवेत ग्रामस्थ,पालक व महिलावर्ग फोटो काढून घेण्यासाठी गर्दी करत होते.
दिंडी सोहळ्यासाठी हिंद सेवा मंडळाचे मानदसचिव  संजय जोशी, वैशाली जोशी,शाळेचे चेअरमन  ऋषिकेश जोशी, रेणुका जोशी,  संजय छल्लारे,  अशोक उपाध्ये बालवाडी विभागाचे चेअरमन सुशीलजी गांधी , स्कूल कमिटी सदस्य अमोल कोलते,  गोपाल उपाध्ये, सौ. रत्नमाला गाडेकर ,  अरुण धर्माधिकारी,  संजय कासलीवाल,चंद्रकांत सगम,विजय सेवक, तसेच श्रीमती रमाताई धीवर प्रशासकीय अधिकारी श्री बी एस कांबळे सर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना पंढरपूर तीर्थक्षेत्राचे आणि वारीचे महत्व कळावे,त्यांना प्रत्यक्षात दिंडी सोहळा,रिंगण सोहळा कसा आयोजित करतात त्याची माहिती दिली असल्याचे  मुख्याध्यापक सचिन मुळे यांनी सांगितले.

दादा वामन जोशी नवीन मराठी शाळेत आषाढी एकादशी निमित्त बालदिंडीचे आयोजन करण्यात आले होते.

Leave a Comment

संबंधित बातम्या

भगवंताचे नामस्मरण हीच खरी  संपत्ती-मंहत रामगिरी महाराज;शनी देवगाव येथे गोदातीरी अवतरली प्रतिपंढरी

श्रीरामपूर-हरिनाम व रामनाम घेतल्याने पाप नष्ट होते.मनुष्याला व्यसन लागल्यावर ते सुटत नाही परंतु संताच्या सान्निध्यात आल्यामुळे त्याच्या जिवनात बदल होतो.भगवंताचे नामस्मरण हीच खरी संपत्ती आहे.विस पंचवीस वर्षापूर्वी काही  थोरामोठ्यांचे,संताचे चरित्र पाठ्यपुस्ताकात

कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार-जलसंपदा मंत्री विखे पाटील;नदीजोड प्रकल्पाच्या पहिल्या कार्यालयाचे लोकार्पण

श्रीरामपूर- ‘नदीजोड’च्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे कोकणातील अतिरिक्त पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यात येणार असून पर्जन्यछाया असलेल्या भागांमध्ये जलसिंचनाची मोठी सुविधा उपलब्ध होणार असल्याचे प्रतिपादन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.नाशिक

साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचे सोने-मंहत रामगिरी महाराज;शनि देवगाव सप्ताहात गोदावरी नदीतीरी लाखो भाविकांची मांदियाळी

श्रीरामपूर-मानवाच्या मन व बुद्धी यांचे शुद्धीकरण करण्यासाठीच आपल्या साधुसंतांनी अखंड हरिनाम सप्ताह सारख्या परंपरा सुरू केल्या.ज्याप्रमाणे परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होते,त्याचप्रमाणे साधू संताच्या संगतीने मानवी आयुष्याचेही सोने होते,असे प्रतिपादन महंत रामगिरीजी

लोणी खुर्द येथे घरकुलासाठी ४७ गुंठे जागेचा प्रस्ताव शासनाकडे- मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील; ८ कोटी रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन उत्साहात

श्रीरामपूर-लोणी खुर्द येथील भीमनगर वसाहतीमधील रहिवाशांना त्यांच्या हक्काचे घरकुल मिळावे, यासाठी गेल्या सहा महिन्यांपासून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शासनाच्या मालकीची ४७ गुंठे जागा निश्चित करून तिचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला

भाजपच्या माजी नगरसेवकाला मारहाण करणाऱ्या आरोपींना बेड्या;श्रीरामपूर शहर पोलीसांकडून चोवीस तासात आरोपी गजाआड

श्रीरामपूर-भाजपचे माजी नगरसेवक दिपक चव्हाण यांना मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या पाच आरोपींना श्रीरामपूर शहर पोलिसांच्या पथकानेबेलापूर परिसरात सापळा रचून चोवीस तासाच्या आत  अटक केली आहे.याबाबत सविस्तर माहिती अशी

अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने मनाची शुद्धी- महंत रामगिरी महाराज;देवगाव शनी येथील सप्ताहाने ओलांडला 5 लाख भाविकांच्या उपस्थितीचा टप्पा

श्रीरामपूर-मनुष्यामध्ये बदल व्हायचा असेल तर त्यांच्या मनाची वृत्तीच बदलली पाहिजे. मनोवृत्ती बदल झाला तरच खर्‍या अर्थानं समाजामध्ये एक प्रकारची शांतता, समाधान लाभेल. अखंड हरिनाम सप्ताहातील भजनाने भक्ताच्या मनाची शुद्धी होते. मनाची वृत्ती

Latest News

Trending News