डॉलरमध्ये कमाईचा फुगा फुटला..? जादा परताव्याचेआमिष;कंपनीकडून हजारो तरुणांना गंडा

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यासह टाकळीभान परीसरात जादा परताव्याची लालसा दाखवुन एका कंपणीने हजारो तरुणांना गंडा घातल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले आहे. यात फसवणुक...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर तालुक्यासह टाकळीभान परीसरात जादा परताव्याची लालसा दाखवुन एका कंपणीने हजारो तरुणांना गंडा घातल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले आहे. यात फसवणुक झालेल्या तरुणांची संख्या मोठ्या प्रमाणावर असून श्रीरामपूर तालुक्यासह परिसरात त्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. याबाबत टाकलीभान येथील सामाजिक कार्यकर्ते बापुसाहेब शिंदे यांनी अप्पर पोलिस अधिक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार करुन संबधीत कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
          या निवेदनात शिंदे यांनी म्हटले आहे कि, टाकळीभान येथे एका आॕनलाईन शेअर्स कंपणीकडुन टाकळीभान व परीसरात मोठ्या प्रमाणात  कोट्यावधी रुपयांची फसवणूक झालेली आहे. माझा मुलगा शेखर बापूसाहेब शिंदे रा. टाकळीभान ता.श्रीरामपुर जि. अहिल्यानगर याची या  ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीद्वारे आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे.
सदर कंपनीमार्फत माझ्या मुलास “ बोन चॕट ” या माध्यमातून विविध प्रकारचे मेसेज व चॅटिंग येत होते. त्या चॅटिंगद्वारे ऑनलाईन ट्रेडिंगमध्ये मोठा नफा मिळेल, असे आमिष दाखविण्यात आले. त्यानंतर वेळोवेळी झुम अॕपद्वारे मिटींग आयोजित करण्यात येत होती. त्या मिटिंगमध्ये वैजापुर .जि.संभाजीनगर व  नागपूर येथील एक यांनी स्वतःला कंपनीचे प्रतिनिधी व ट्रेडिंग‌ सल्लागार म्हणून सांगून माझ्या मुलाचा विश्वास संपादन केला.
त्यांच्या सांगण्यावरून माझ्या मुलाने विविध तारखांना ऑनलाईन पद्धतीने पैसे गुंतविले. सुरुवातीला नफा मिळत असल्याचे दाखविण्यात आले; मात्र नंतर पैसे परत मिळणे बंद झाले तसेच संबंधित व्यक्तींनी संपर्क टाळण्यास सुरुवात केली. त्यानंतर आमच्या निदर्शनास आले की, हा संपूर्ण प्रकार फसवणुकीचा असून माझ्या मुलाची आर्थिक फसवणूक करण्यात आलेली आहे.
सदर आरोपी  यांनी संगनमताने खोटी माहिती, खोटे आश्वासन व मोठ्या नफ्याचे आमिष दाखवून अनेक लोकांकडून मोठ्या प्रमाणात पैसे उकळून घेतलेले आहेत. या आॕनलाईन कंपनीमार्फत टाकळीभान पंचक्रोशीमध्ये  १५०० ते १६०० लोकांची आर्थिक फसवणूक झालेली आहे. सुरुवातीला सरासरी रुपये ३०,०००/- इतकी रक्कम गुंतवणूक म्हणून घेतली जात होती; मात्र अनेक व्यक्तींनी रुपये ९०,०००/-, १ लाख, ५ लाख, १० लाख, १५ लाख व त्यापेक्षाही अधिक रक्कम गुंतविलेली आहे.
सदर प्रकरणामध्ये एकूण कोट्यवधी रुपयांची फसवणूक झालेली असून, अंदाजे किमान रुपये १५ कोटींपेक्षा जास्त आर्थिक फसवणूक झालेली आहे. या प्रकरणासंबंधी आमच्याकडे  संबंधित माहिती, व्यवहाराचे स्क्रीनशॉट, बँक व्यवहार तपशील, मोबाईल नंबर व इतर आवश्यक पुरावे उपलब्ध आहेत.
अनेक गरीब कुटुंबातील लोकांनी देखील त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून स्वतः ची व इतरांची गुंतवणूक केली असून त्यांची देखील आर्थिक फसवणूक झालेली आहे. त्यामुळे निष्पाप व फसवणूक झालेल्या लोकांना विनाकारण त्रास न देता स्थानिक मुख्य आरोपी व मुळ मास्टरमाइंड यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच सदर कंपनीविरुद्ध तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. तसेच या आर्थिक घोटाळ्याची सखोल चौकशी करून सर्व पीडित गुंतवणूकदारांना न्याय मिळवून द्यावा व फसवणूक झालेली रक्कम परत मिळवून द्यावी ही विनंती  करण्यात आली आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!