पंतप्रधान मोदी यांच्या आवाहानाचा विचार करण्याची आवश्यकता-पालकमंत्री विखे पाटील;खिर्डी येथील पुलाच्या कामाचे भूमीपुजन

श्रीरामपूर-जगातील युध्दजन्य परीस्थिती पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाचा सर्वानीच विचार करण्याची आवश्यकता आहे.उधळपट्टी करून विवाह समारंभ करण्यापेक्षा सामुहीक विवाह...

श्रीरामपूर-
जगातील युध्दजन्य परीस्थिती पाहाता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहानाचा  सर्वानीच विचार करण्याची आवश्यकता आहे.उधळपट्टी करून विवाह समारंभ करण्यापेक्षा सामुहीक विवाह सोहळ्यांचे आयोजन झाले पाहीजे असे मत जलसंपदा तथा पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केले.
श्रीरामपूर तालुक्यातील खिर्डी येथे प्रवरा नदी वरील सुमारे २० कोटी रुपयांच्या निधीतून श्रीरामपूर ते राहुरी तालुक्यांना जोडणार्या पुलाच्या कामाचे भूमीपुजन मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.यावेळी जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, उपाध्यक्ष दीपक पटारे, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे,गिरीधर आसने, नानासाहेब पवार,डॉ. शंकर मुठे,भाऊसाहेब बांद्रे,शरद नवले, संजय फंड,नानासाहेब शिंदे आदींसह अनेक जण उपस्थित होते.

आपल्या भाषणात मंत्री विखे पाटील म्हणाले की,केंंद्र आणि राज्य सरकार देशातील सामान्य माणसाच्या हिताचे निर्णय करीत आहे.पतंप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात राज्यातील महायुती सरकार सुध्दा विकासाभिमुख निर्णय करून काम करीत आहे.
नुकत्याच पश्चिम बंगाल आसाम आणि अन्य राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश हे विकासाचे आणि विचारांचे आहे.देशातील जनता विकासाच्या पाठीशी उभी राहाते आणि विचारांना साथ देते असे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की,देशाला अस्थिर करू पाहाणार्या शक्ती नेस्तनाबूत झाल्या आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्य दुष्काळमुक्त करताना भारनियमनाच्या संकटातून राज्याची सुटका करण्यासाठी काम सुरू आहे.गावोगावी सौरऊर्जा प्रकल्प उभे राहात आहेत.शेतकऱ्यांना सौर पंपाच्या माध्यमातून सहकार्य होत आहे.जिल्ह्यात आतापर्यत ३९हजार मंजूर झाले असून दिवसा वीज उपलब्ध करून देण्यासाठी महायुती सरकार प्रयत्नशील असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे.राज्य सरकारने कर्ज माफी करण्याचा निर्णय घेतला असून,वीज बील माफ करण्याचा निर्णय घेतला.नैसर्गिक संकट तसेच विविध योजनांचा निधी शेतकऱ्यांना मिळत आहे.
श्रीरामपूर तालुक्यातील चर अतिक्रमण मुक्त करण्याचे काम सुरू झाले आहे.५३किलो मीटरचे काम पावसाळ्या पुर्वी पूर्ण होईल असे स्पष्ट करून मंत्री विखे पाटील म्हणाले की,वळणगाव बंधारा कामासाठी तसेच मध्यमेश्वर बंधार्याचे बॅरेजेस मध्ये रूपांतर करण्यासाठी आवश्यक असणारा निधी उपलब्ध करुन देण्याची ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!