श्रीरामपूर-
राहता तालुक्यातील पिंपरी निर्मळ परिसरात सुरू असलेल्या बेकायदा गर्भ लिंग निदान प्रकरणाच्या तपासात पोलिसांनी श्रीरामपूर येथील डॉक्टर व दोन एजंटना अटक केली आहे.पुण्यात अन्यही काही डॉक्टर, एजंट यात सामील असण्याची शक्यता असून त्याबाबताही पोलिसांकडून बारकाईने तपास सुरु आहे. यातील एजंट प्रदीप ढगे याच्याकडे लिंग निदान चाचणी करणारे आणखी एक मशीन मिळून आले असून ते देखील पोलिसांनी जप्त केले आहे. लिंगनिदान चाचणी करणारे डॉक्टर,एजंट, दलाल यांच्यावर त्याचप्रमाणे संबंधित महिलेच्या कुटुंबीयांवर एवढ्या मोठ्या संख्येने अटक करून केलेली ही राज्यातील पहिलीच कारवाई असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दि.२९/०४/२०२६ रोजी सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक यांच्या पथकाने पिंपरी निर्मळ शिवारात, ता. राहाता येथील निळवंडे कॅनॉल शेजारी जावुन सापळा रचुन तेथे छापा टाकुन सदर ठिकाणावरुन डॉ. राहुल आबासाहेब भनगे, वय ३४ वर्ष, धंदा बी.ए.एम.एस. डॉक्टर, रा. भानसहिवरे, ता. नेवासा, जि.अहिल्यानगर, अभिजीत दिलीप भुसाळ, वय ३० वर्ष, धंदा- जे.एन.एम. नर्सिंग, रा. पिंपरी निर्मळ, ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांना २४,०९,१००/- रुपयांच्या किं.चा मुददेमालसह अटक करण्यात आली होती.
सदर गुन्हयाचे तपासामध्ये अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना गुप्त बातमीदार मार्फत २ एजंट प्रदिप भाऊसाहेब ढगे, वय ३२ वर्ष, रा. कोहऱ्हाळे, ता. राहाता, जि. अहिल्यानगर, निलेश ज्ञानेश्वर भवर, वय ४२ वर्ष, रा. नपावाडी ता. राहाता, जि. अहिल्यानगर यांचाही सहभाग असल्याचे समजले. म्हणुन अपर पोलीस अधीक्षक, श्रीरामपुर कार्यालयातील पथक व लोणी पोलीस स्टेशन यांच्या सयुक्त कारवाईने सदर दोनही इसमांना शिताफीने ताब्यात घेवुन लोणी पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे. सदर गुन्हयातील अटक आरोपीस चौकशी केली असता त्यांनी श्रीरामपुर येथील डॉ.रविंद्र कुटे यांचाही यात सहभाग असल्याचे सांगीतल्याने सदर आरोपी डॉ. रविंद्र कुटे रा.श्रीरामपुर यांनाही सदर गुन्हयात अटक करण्यात आली आहे.
तसेच त्यांचे अटकेमुळे सदर गुन्हयात आणखी काही एजंट व डॉक्टरांचा सहभाग असल्याची दाट शक्यता असुन त्याचा पुढील तपास लोणी पोलीस स्टेशन करीत आहे.यातील नव्याने अटक केलेल्या तीनही आरोपींना आज राहता कोर्टापुढे हजर गेले असता तिघांनाही 3 दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे.
सदरची कारवाई ही मुम्मका सुदर्शन, पोलीस अधीक्षक, अहिल्यानगर, सोमनाथ वाघचौरे, अपर पोलीस अधीक्षक श्रीरामपुर, जयदत्त भवर, उपविभागीय पोलीस अधिकारी, श्रीरामपुर, मार्गदर्शनाखाली स.पो.नि. युवराज आठरे, पो.स.ई. आशिष चौधरी, पो.हे.कॉ. दादासाहेब लोढे, पो.हे.कॉ. संदिप दरंदले, पो.कॉ. अशोक गाडे, पो.कॉ. राजेंद्र बिरदवडे, पो.हे.कॉ. असिर सय्यद, पो.हे.कॉ. साईनाथ राशिनकर, पो.ना. सचिन शेवाळे, पो.कॉ. भोईटे, म.पो.कॉ. मनिषा गिरी यांनी केली आहे.
