हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले...

श्रीरामपूर
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले असल्याने या जमिनींचे मूळ मालक असलेले आंदोलक शेतकरी संतप्त झाले आहेत.चुल बंद व जेलभरो आंदोलन करून या प्रश्नाकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी हे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष ऍड अजित काळे यांच्या नेतृत्वाखालील सुरू असलेल्या आंदोलनाचा हा दुसरा टप्पा आहे. आपल्या हक्कांच्या जमिनी सरकारकडून परत मिळवण्यासाठी शेतकऱ्यांचा सुरू असलेल्या या संघर्षाने राज्याचे लक्ष वेधून घेतले आहे.
आज आकारी पडीत शेतकऱ्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोरच चुली मांडून त्यावर स्वयंपाक सुरू केला.आपली गुरे ढोरे पोलीस ठाण्याच्या आवारात बांधली. या आंदोलनात महिलांचा सहभाग लक्षणीय आहे पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था चे कारण देत आंदोलकांना कलम 168 खाली नोटिसा बजावल्या होत्या परंतु शेतकऱ्यांनी त्यांना न जुमानता पोलीस ठाण्याच्या आवारातच चुली मांडून आपल्या घरादारासह आंदोलनात सहभाग नोंदवला या अनोख्या जेलभरो आंदोलनामुळे प्रशासनाची मात्र मोठी धावपळ उडाली असून पोलीस ठाण्याच्या आवारात चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.’जमीनी आमच्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या’ अशा घोषणांनी पोलीस ठाण्याचा परिसर दणाणून गेला होता.या आंदोलनंतर आकारी पडीत शेतकऱ्यांच्या जमीन वाटपाचा हा तिढा सुटतो का याकडे जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागलेले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!