श्रीरामपूरची शांतता भंग करण्याचा काही जणांचा प्रयत्न-आ.ओगले;पोलीसांच्या कार्यपद्धतीवर नाराजी

श्रीरामपूर-श्रीरामपूरचा जातीय सलोखा बिघडवून शांतता भंग करण्याचा काहींचा प्रयत्न आहे त्यांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा आमदार...

श्रीरामपूर-
श्रीरामपूरचा जातीय सलोखा बिघडवून शांतता भंग करण्याचा काहींचा प्रयत्न आहे त्यांचा तातडीने बंदोबस्त करा अन्यथा रस्त्यावर उतरावे लागेल असा इशारा आमदार हेमंत ओगले यांनी दिला आहे.
     नुकत्याच झालेल्या राम-रहीम उत्साह मध्ये घडलेल्या प्रकाराबाबत  आ.ओगले यांच्यासह  नगराध्यक्ष करण ससाणे यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन पोलीस प्रशासनाला जाब विचारला, यावेळी श्रीरामपुरातील नगरसेवक, व्यापारी, डॉक्टर, वकील यांच्यासह प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
      पोलीस प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या काही दिवसांपासून श्रीरामपूर हे गुन्हेगारीचे केंद्र बनले आहे. खुल्याआम हत्या, हाणामाऱ्या, सर्रासपणे अवैध गावठी कट्टे यांसारख्या गोष्टी घडवून जाणीवपूर्वक दहशत माजवण्याचा काहींचा प्रयत्न आहे. कायदा व सुव्यवस्था राखण्याची राखण्याची जबाबदारी ज्या पोलिस प्रशासनावर आहे तेच हतबल झाल्याचे चित्र दिसत आहे. त्याचे ताजे उदाहरण देण्याचे झाल्यास सध्या चालू असलेल्या राम-रहिम उत्सव चालू आहे. त्यामध्ये सय्यद बाबा उरुस चालू असताना छत्रपती शिवाजी महाराज चौकात एका इसमावर प्राणघातक हल्ला झाला. लगेच दुसऱ्या दिवशी श्रीराम नवमीच्या झेंडा मिरवणुकीवर दगडफेक करण्यात आली. श्रीराम नवमीच्या यात्रेत काही स्वयंघोषित धर्मरक्षक म्हणवून घेणाऱ्यानी जातीयवाद करुन यात्रा बंद पाडण्याचा घाट घातला. त्याच्याच दुसऱ्या दिवशी श्रीराम मंदिर चौकात भर यात्रेत एका इसमावर प्राणघातक हल्ला करण्यात आला.
            अशा प्रकारे ऐन सणासुदीच्या काळात गावात दहशत माजवून गावची शांतता भंग करण्यात आली आहे. आणि हा सगळा प्रकार पोलिस प्रशासन उघड्या डोळ्यांनी बघत आहे. काही  प्रवृत्तींना गावात जाती जाती मध्ये, धर्मामध्ये द्वेष पसरवून जातीय सलोखा बिघडवून अशांतता पसरवायचे आहे.
         समाजकंट हा कुठल्याही धर्माचा अथवा जातीचा नसतो अशांवर तातडीने गुन्हे दाखल करावे अन्यथा श्रीरामपूरचे नागरिक कायदेशीर रित्या प्रशासना विरोधात आंदोलन करतील असा इशारा दिला आहे.
       या निवेदनावर जिल्हाध्यक्ष सचिन गुजर, माजी सभापती बाबासाहेब दिघे, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर मुरकुटे, सभापती सुधीर नवले, तालुकाध्यक्ष प्रमोद भोसले, शहराध्यक्ष अण्णासाहेब डावखर, व्यापारी असोसिएशनचे राहुल कोठारी, गटनेते मुजफ्फर शेख, दिलीप नागरे, मार्केट कमिटीचे संचालक राजेंद्र पाऊलबुद्धे, राजू चक्रनारायण,  सभापती राजेंद्र पवार, दिपक वमने, योगेश जाधव, रईस जहागिरदार, पंडित मामा बोंबले, गौतम उपाध्ये, अशोक उपाध्ये, अहमदभाई जहागिरदार, मुन्ना झंवर , राहुल कोठारी, नंदूशेठ कोठारी, निलेश बोरावके, मुन्ना पठाण, नीलेश नागले, लकी सेठी, बिट्टू कक्कड, रवींद्र खिलारि, बाळासाहेब खाबीया, डॉ. सलीम शेख, संतोष परदेशी, कलीम कुरेशी, जावेद शेख, सुधीर वायखिंडे, अशोक बागुल, रितेश एडके, रमेश घुले, सरबजित चूग, रितेश चव्हाणके, जफर शहा, योगेश ओझा, प्रशांत डावखर, नवाज जहागिरदार, रावसाहेब आल्हाट, जीवन सुरुडे, मास्टर सरवरअली, सागर भागवत, युनुस पटेल, भाग्येश लोखंडे, सुरेश ठुबे, संदेश गोर्ड, सुनील साबळे , संजय गोसावी, अशोक जगधने, योगेश गायकवाड, परेश गाडेकर, सनी मंडलिक, राजेश जोंधळे, सागर दुपटी यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!