जमीन वाटपात कुणीही राजकारण केले तर बदडून काढू;आकारी पडीत शेतकऱ्यांचा गर्भित इशारा
श्रीरामपूर-आम्ही शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत.आमच्या वाडवडिलांच्या हक्काच्या जमिनी संदर्भात स्थानिक आमदार, खासदार, मंत्री कुणीही मदत केली तर त्यांना आम्ही...
श्रीरामपूर- आम्ही शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने आंदोलन करणार आहोत.आमच्या वाडवडिलांच्या हक्काच्या जमिनी संदर्भात स्थानिक आमदार, खासदार, मंत्री कुणीही मदत केली तर त्यांना आम्ही आकारी पडीत शेतकरी डोक्यावर घेऊ.मात्र या जमीन वाटप संदर्भात कुणीही राजकारण केले तर त्यांना बदडून काढू असा इशारा आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वतीने शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अँड. अजित काळे यांनी दिला. शासन जमिनीचे मालक कधीच झालेले नसून शेतकऱ्यांकडून जमिनी संपादित केलेल्या नाहीत,असे आशयाचे पत्र शासनाच्या वतीने उच्च न्यायालयात सादर केल्यानेच संभाजीनगर उच्च न्यायालयाने आठ आठवड्यांत जमिनी वाटपासंदर्भात निर्णय घेण्याचे निर्देश १४ ऑगस्ट २०२४ रोजी राज्य सरकारला दिले होते.त्यानंतर, सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देऊनही सरकार मुळ वारसांना जमीन वाटप करण्याचा निर्णय घेत नसल्याने आज आम्हाला आत्मक्लेश आंदोलन करावे लागले.या आंदोलनाची दखल १५ दिवसात महायुतीच्या सरकारने घेतली नाही तर जलभरो आंदोलन आणि त्यानंतर जमिनीवर कब्जा आंदोलन करण्याचा ईशाराही आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वतीने अँड.अजित काळे यांनी दिला.ते शहरातील महात्मा गांधी पुतळ्यासमोरील आयोजित आत्मक्लेश आंदोलकासमोर मार्गदर्शन करताना बोलत होते. शेती महामंडळाच्या हरिगाव मळा पंचक्रोशीतील शिरसगाव, वडाळा महादेव,ब्राम्हणगाव, ऊंदिरगाव,खैरी निमगाव, खानापूर,माळवाडगाव,मुठेवाडगाव या ९ गावातील आकारी पडीत शेतकऱ्यांचे जमिनी संदर्भात अनेक दशकांपासून आंदोलन सुरू असून शेतकरी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष अँड अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखालील आंदोलन अंतिम अन् निर्णायक टप्प्यावर आलेले आहे. उच्च न्यायालयाने राज्य सरकारला ८ आठवड्यांत म्हणजे ६० दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेले असतानाही शासनस्तरावर कुठलीही हालचाल झालेली नाही. उलट शासनाने ४ हजार एकर जमीन उद्योगास देण्यासाठी हालचाली सुरू केल्याने हे आंदोलन अधिकच तीव्र झाल्याने आज शुक्रवार दि. २० मार्च रोजी महात्मा गांधी पुतळ्यासमोर अँड अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली हजारो महिला पुरुष शेतकऱ्यांचे उपस्थितीत आत्मक्लेश आंदोलन करण्यात आले.
या प्रसंगी अँड अजित काळे पुढे म्हणाले की या आकारी पडीक जमिनी वाटपा संदर्भात ईतिहास पार्श्वभूमी सर्वांना माहित आहे. या संदर्भात शासनाला निर्णय घ्यावा लागणार आहे.परंतू आपण अशीच खंबीर साथ दिली तर यशोशिखर दूर नाही. सध्या ४ हजार एकर झेड आर टू कंपनीला देण्याचा मुद्दा अधिवेशनात खुप गाजतो आहे. मात्र या अधिवेशनात विरोधी पक्षाचे वडेट्टीवार यांनी ४ हजार एकर जमीन व त्या जमिनींचे व्हॅल्युवेशन सभागृहाचे निदर्शनास आणून दिले.मात्र या जमिनी गोरगरीब कष्टकरी शेतकरी यांच्या आहेत याबद्दल चकार शब्दही उच्चारला नाही,असेही शेवटी अँड अजित काळे म्हणाले.आत्मक्लेश आंदोलनात महात्मा गांधी यांची प्रतिकात्मक वेशभूषा खानापूर येथील उत्तम शिंदे ( गोसावी) तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या वेशभूषा टाकळीभानचे कार्लस साठे यांनी हातात संविधान प्रत घेऊन वठवली. दुपारी दोन नंतर राजकारण विरहित फक्त आकारी पडीत या विषयावर प्रथम प्रकाश चित्ते, सुरेश ताके, शालनबाई झुराळे गंगाधर चौधरी, सचिन वेताळ, शरद आसने दत्तात्रय मुठे रूपेश काले यांच्या मनोगतानंतर जिल्हाध्यक्ष अनिल औताडे, तालुकाध्यक्ष युवराज जगताप यांनी मनोगत व्यक्त केले. तहसिलदार मिलिंद वाघ,शहर पोलीस निरीक्षक देशमुख यांनी यांनी शासनाच्या वतीने निवेदन स्वीकारले.अनेक वर्षांपासूनच्या तालुक्यात थंडावलेल्या मोर्चा बऱ्याच वर्षाने निघालेल्या या मोर्चास गावातील गावोगावचे शेतकरी संघटनेचे सर्व प्रमुख पदाधिकारी यांच्यासह महिला पुरुष तरूण मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
आ.ओगले यांच्याकडून आकारी पडीत शेतकऱ्यांना अद्यापही मदतीची अपेक्षा! श्रीरामपूर तालुक्याचे कॉग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी विधानसभेत आवाज ऊठविण्याचा प्रयत्न केला.परंतू उर्वरित काळात पोटतिडकीने आम्हा कष्टकरी आकारी पडीक शेतकऱ्यांचा प्रश्न पोटतिडकीने उचलून धरल्यास आम्ही तुमचे कौतुक करू असे अँड.अजित काळे म्हणाले.
जमिनी वाटपात कुणीही मोठ्या नेत्याने राजकारण केल्यास बदडून काढू! आज संपूर्ण तालुक्यातील राजकीय नेत्यांसह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी यांचे लक्ष या आकारी पडीत आत्मक्लेश आंदोलनाकडे होते.परंतु कुणाही पक्षाचे पदाधिकारी आंदोलनाकडे फिरकले नाहीत.आम्हाला साथ देणाऱ्या कुठल्याही राजकीय पक्षाचे नेत्यांना आम्ही खांद्यावर घेऊन नाचू.जिल्ह्याचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी उच्च न्यायालयात शासनाचे वतीने पत्र सादर केल्याने आम्ही तेव्हापासून त्यांचे कौतुक करत आहोत.मात्र या आकारी पडीत शेतकऱ्यांची सत्य बाजू असताना विरोधात कितीही वरिष्ठ मंत्रीमहोदय पासून स्थानिक पातळीवरील नेत्यापर्यत कुणीही राजकारण केले तर आम्ही आकारी पडीत महिला पुरुष शेतकरी बदडून त्यांना काढल्याशिवाय राहणार नाही.
बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन
श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या
श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि
श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या
श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी