श्रीरामपूर-
शहरातील मोरगे वस्ती परिसरातील रस्त्यांची माहिती देणारे दिशादर्शक फलक धुलीवंदनच्या सुट्टीच्या दिवशी काढण्यात आल्याने भाजपच्या नगरसेवकांनी नगरपालिकेच्या गेटवर ठिय्या आंदोलन करत सत्ताधाऱ्यांच्या मनमानीला विरोध केला. यावेळी भाजप गटनेत्या वैशाली चव्हाण, नगरसेवक श्रीनिवास बिहाणी, भाजप शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, सरचिटणीस केतन खोरे, संजय छल्लारे, आशिष धनवटे, संजय गांगड, दिपक चव्हाण, रवी पाटील, शशांक रासकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या कार्यशैलीवर जोरदार आक्षेप घेतला.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, २०१७-१८ काळात भाजप नगरसेवक दीपक चव्हाण यांनी मोरगे वस्ती परिसरात दिशादर्शक फलक लावले होते. हे सगळे बोर्ड नगराध्यक्ष करण ससाणे व मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांच्या तोंडी आदेशाने सुट्टीच्या दिवशी काढल्याची माहिती अतिक्रमण विभाग प्रमुख अभिषेक मराठे यांनी दिल्याने भाजप नगरसेवक आक्रमक झाले. सत्तेत येताच हुकूमशाही पद्धतीने सुरू असलेल्या काँग्रेसच्या कारभाराचा नगरसेवक श्रीनिवास बिहाणी व संजय छल्लारे यांनी निषेध केला. तर भाजप शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड व सरचिटणीस केतन खोरे यांनी सत्ताधारी चुकीच्या पद्धतीने शहरातील नागरिकांना त्रास देत असतील तर त्यांना जशास तसे उत्तर देण्याची भूमिका घेतली.
नगरसेवक संजय गांगड व आशिष धनवटे यांनी नगरपालिका प्रशासनास जाब विचारत आमदार हेमंत ओगले यांचे शहरात लावलेले अनधिकृत बोर्ड कधी काढणार? असा जाब विचारला. यावेळी भाजपच्या पुष्पा हरदास, महिला शहराध्यक्षा स्वाती चव्हाण, पूजा कांबळे, विशाल अंभोरे, किरण उईके, सागर म्हस्के, रूपेश हरकल, बाळासाहेब नागरे, बाळासाहेब हरदास, सतीश पाटणी, सचिन धोत्रे, राजू चव्हाण, राहुल फुलारे, शरद जाधव, किरण पठारे, अस्लम शेख, भाऊसाहेब निपुंगे, सचिन कापसे, नवनाथ पवार, शिवम चव्हाण, अलकाताई चव्हाण,अर्चनाताई जाधव, नंदाताई चव्हाण, ललित कोठारी, किरणसिंग टाक, रतनसिंग टाक आदींसह भाजप कार्यकर्ते उपस्थित होते.
