कर्जमुक्ती योजनेत पतसंस्थेसह सहकारी बँकेचा समावेश करा-शेतकरी संघटनेची मागणी

श्रीरामपूर-राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 30 जून 2026 पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती योजना राबवत आहे. परंतु सदर योजनेत सातबारा...

श्रीरामपूर-
राज्य सरकार राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी 30 जून 2026 पूर्वी राज्यातील शेतकऱ्यांसाठी संपूर्ण कर्जमुक्ती योजना राबवत आहे. परंतु सदर योजनेत सातबारा उताऱ्यावरील पतसंस्था व को-ऑपरेटिव्ह कमर्शियल बँकांचा अर्थात व्यापारी सहकारी बँकांचा समावेश नसल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे त्यांचा समावेश कर्जमुक्ती योजनेत करावा या मागणीचे निवेदन अहिल्यानगर जिल्हा शेतकरी संघटनेच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री यांना जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांच्या माध्यमातून देण्यात आले आहे.
शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने निवेदनात म्हटले आहे की, आज पर्यंत राज्य सरकारने व केंद्र सरकारने कर्जमुक्ती योजनेमध्ये राज्यातील पतसंस्थेचा व व्यापारी सहकारी बँकेचा समावेश केलेला नाही .परंतु सदर वित्तीय संस्थांना शेतीसाठी किमान पाच टक्के वित्तीय पुरवठा करण्याचे बंधनकारक केलेले आहे. सदर वित्तीय संस्थेकडून शेतकऱ्यांनी शेतीसाठी कर्ज घेतले असून सदर कर्ज सातबारा उताऱ्यावर नोंद केलेली आहे. जिल्हा बँका व राष्ट्रीयकृत बँकांच्या तुलनेत संबंधित वित्तीय संस्थेच्या कर्जाचा व्याजाचा बोजा ही जास्त आहे. पतसंस्था व व्यापारी सहकारी बँकेकडून एक रकमी परतफेड योजना ही राबवली जात नाही. वास्तविक राष्ट्रकुल बँकांनी सिबिलच्या निकषामुळे शेतकऱ्यांना कर्ज नाकारले जाते त्यामुळे साहजिकच शेतकरी हा शेती व्यवसाय करण्याच्या उद्देशाने संबंधित वित्तीय संस्थेकडून कर्ज घेतले आहे. राज्य सरकारने वेळोवेळी सहकारी पतसंस्था व व्यापारी सहकारी बँका यांना अशा थकलेल्या कर्जांच्या बाबतीत एक रकमी कर्ज परतफेड योजना राबविण्याच्या उद्देशाने वेळोवेळी शासन निर्णय करूनही सदर बँकांनी संबंधित राज्य शासनाच्या योजनेची प्रभावी अंमलबजावणी केलेली नाही.
तरी राज्य शासनाने 30 जून पूर्वी राबवित असलेली शेतकरी कर्जमुक्ती योजनेत राज्यातील शेतकऱ्यांबाबत भेदभाव न करता सातबारा उताऱ्यावरील रकमेची तारखेची व क्षेत्राची अट न लावता स्वातंत्र्यप्राप्तीनंतर किमान एकदा तरी शेतकऱ्यांच्या माथी असलेल्या कर्जातून मुक्तता करावी. तसेच अशा महत्त्वकांक्षी शेतकरी कर्जमुक्ती योजनेस स्वर्गीय शरद जोशी शेतकरी कर्जमुक्ती योजना या नावाने अस्तित्वात आणावी अशा आशयाची निवेदन जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांना देऊन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे. सदर मागणीचा राज्य शासनाने कर्जमुक्ती योजनेत कुठलाही भेदभाव न करता आदरपूर्वक सन्मान करून शेतकऱ्यांमध्ये भविष्यात होणारा असंतोष टाळावा असेही म्हटले आहे.यावेळी जिल्हाध्यक्ष अनिलराव औताडे, श्रीरामपूर तालुका अध्यक्ष युवराज जगताप, साहेबराव चोरमल, सुदामराव औताडे, सतीश नाईक, विलासराव पटारे, संतोष पटारे, रमेश आसणे, भरत वमने, दिलीप औताडे, रमेश औताडे, शैलेश वमने, दत्तात्रेय दळे, शरद ताके, सोपान दळे, शिवाजी दळे, संतोष दळे, सतीश औताडे, शिवाजी दळे व मुजीदभाई इनामदार आदी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!