श्रीरामपूर नगरपालिकेच्या ४ कर्मचाऱ्यांची तब्येत बिघडली;उलट सुलट चर्चेला उधाण

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छतेचे काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना आज मंगळवारी सकाळी मळमळ व चक्कर येऊ लागल्याने अचानकपणे त्यांना तातडीने श्रीरामपूर...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर नगरपालिकेच्या आरोग्य विभागात स्वच्छतेचे काम करणाऱ्या 4 कर्मचाऱ्यांना आज मंगळवारी सकाळी मळमळ व चक्कर येऊ लागल्याने अचानकपणे त्यांना तातडीने श्रीरामपूर शहरातील साखर कामगार रुग्णालयात आयसीयुमध्ये दाखल करण्यात आले. या घटनेच संपूर्ण शहरात उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.
या प्रकरणी अधिक माहिती घेतली असता श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर 7 मधील बेलापूररोड परिसरातील बजरंगनगर जवळील भागात हे स्वच्छता कर्मचारी हातानेच विषारी पावडर मारत होते. त्यावेळेला त्यांच्या हातात ग्लोज किंवा तोंडाला मास्क नव्हते असे तेथील लोकांनी सांगितले आहे.पावडर मारतेवेळी वासाने चक्कर येऊ लागल्याने व मळमळ होऊ लागल्याने तातडीने मुकादम व नागरिकांनी त्यांना साखर कामगार रुग्णालयात दाखल केले.ज्या ठेकेदाराकडे हे कर्मचारी आहेत ते अधिकृत पालिकेचे कर्मचारी आहे की कंत्राटी हे मात्र समजू शकले नाही.दरम्यान यासंबंधी साखर कामगार रुग्णालयाशी संपर्क साधला असता पालिकेच्या स्वच्छ विभागात काम करणारे 4 कर्मचारी मळमळ होऊ लागल्याने व चक्कर येऊ लागल्याने तसेच त्यांना त्रास होत असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान ठेकेदाराचा हलगर्जीपणा का पालिकेच्या आरोग्य विभागाचा हलगर्जीपणा ? नेमके कोणाच्या हलगर्जीपणामुळे या कर्मचाऱ्यांना हा त्रास झाला याची चर्चा सुरू असून  या कर्मचाऱ्यांची नावे सुनील बागडे वय 50,चंद्रकांत दळवी,वय 56,गोकुळ मारसाळे,वय 34 ,अरुण अस्वले,वय 35 असे असल्याचे समजले.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!