डिजिटल क्रांतीमुळे पत्रकारितेचा चेहरा मोहरा बदलला;श्रीरामपूर येथील पत्रकार कार्यशाळेत मंथन

श्रीरामपूर-डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही औपचारिक पदवीशिवाय सामान्य माणूसही बातमीदारी करू शकत आहे. मात्र याकडे आव्हान म्हणून न पाहता त्यात संधी शोधून पत्रकारांनी...

श्रीरामपूर-
डिजिटल क्रांतीमुळे कोणत्याही औपचारिक पदवीशिवाय सामान्य माणूसही बातमीदारी करू शकत आहे. मात्र याकडे आव्हान म्हणून न पाहता त्यात संधी शोधून पत्रकारांनी ग्रामीण भागातील प्रश्नांना वाचा फोडावी,असे आवाहन श्रीरामपूर येथे आयोजित पत्रकार कार्यशाळेत जेष्ठ पत्रकार मंडळींकडून करण्यात आले.
     बेलापूर रस्त्यावरील अनमोल रसवंती येथे शनिवारी आचार्य बाळशास्त्री जांभेकर जयंतीनिमित्त कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दैनिक लोकमतचे संपादक सुधीर लंके, दैनिक सार्वमतचे संपादक अनंत पाटील, पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक गाडेकर, राज्य अधिस्वीकृती समिती सदस्य प्रकाश कुलथे, करण नवले, अनिल पांडे, महेश माळवे, राजेंद्र बोरसे, बाळासाहेब भांड,नितीन शेळके,मिलिंदकुमार साळवे, विकास अंत्रे, रवी भागवत, भास्करराव खंडागळे, मारुती राशीनकर, सुनील मुथा आदी उपस्थित होते.
कार्यशाळेत सुधीर लंके यांनी कोविडनंतर ग्रामीण पत्रकारितेसमोरील आव्हाने व अनंत पाटील यांनी डिजिटल साधनांचा वापर संधी व आव्हाने या विषयावर मनोगत व्यक्त केले.
कोविड नंतरच्या काळात अगदी गाव खेड्यामध्ये डिजिटल पत्रकारितेचे युग सुरू झाल्याचे पाहायला मिळते. अनेक जण आपापल्या गाव परिसरातील प्रश्नांचे वृत्तांकन डिजिटल साधनांद्वारे करत आहेत. वृत्तपत्रातील प्रतिनिधींनी सुद्धा हे तंत्रज्ञान आत्मसात करणे ही काळाची गरज आहे. ज्यांच्या रक्तामध्ये पत्रकारिता भिनलेली आहे, त्यांना मात्र डिजिटल युगातही संधी राहील. केवळ पदवी मिळवली म्हणजे कोणीही पत्रकार ठरत नाही. तर बातमीदारीसाठी ज्याच्याकडे विषय आहेत तो पत्रकार. डिजिटल क्रांतीचे युग येत्या काळात अधिक गतिमान होईल, असे मत लंके व पाटील यांनी व्यक्त केले. श्रीरामपूर पत्रकार संघाचे वतीने पत्रकारांसाठी कार्यशाळा आयोजित करणे ही उल्लेखनीय बाब आहे असा गौरवही त्यांनी केला.
यावेळी पत्रकार महेश रक्ताटे,दीपक उंडे, सलीमखान पठाण, सुनील कुलकर्णी, गौरव साळुंखे दिलीप लोखंडे अर्जुन राऊत, अशोक पटारे, विशाल वर्धावे, राजेंद्र गागरे प्रदीप आहेर, प्रा. बाळासाहेब शेळके उपस्थित होते. रयत शिक्षण संस्थेच्या बोरावके महाविद्यालयाचे वृत्तपत्र विद्या अभ्यासक्रमाचे विद्यार्थी उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!