लावणी महोत्सवाने जिंकली रसिकांची मने;पोलीस उपअधीक्षक जयदत्त भवर यांच्या हस्ते थाटामाटात उद्घाटन

श्रीरामपूर-सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन...

श्रीरामपूर-
सांस्कृतिक कार्य विभाग, सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन यांच्या वतीने राज्यातील लोककला, लोकपरंपरा व लोकसंस्कृतीचे जतन व संवर्धन व्हावे, तसेच नवीन पिढीला आपल्या उच्च संस्कृतीची व परंपरेची ओळख नवमाध्यमातून व्हावी, या उद्देशाने लावणी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले
सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्या अभिनव कल्पनेतून व सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सन 2026 लावणी महोत्सव श्रीरामपूर येथे दि. 20 ते 22 फेब्रुवारी या कालावधीत खा. गोविंदराव आदिक नाट्यगृह  येथे आयोजित करण्यात आला आहे.या लावणी महोत्सवाचे उद्घाटन उपविभागीय अधिकारी जयदत्त भवर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक पटारे,पोलीस निरीक्षक नितीन देशमुख, सार्वजनिक गणपती मंडळाचे अध्यक्ष मनोज नवले, सांस्कृतिक कार्य संचालनाचे संभाजीनगर विभागाचे प्रमुख सचिन पाखरराव,लावणी महोत्सव संचालक दादा साळुंके,भाजपा युवामोचाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पटारे,विशाल अंभोरे,लावणी कलापथकाच्या आशा वैशाली नगरकर, श्रद्धा पुणेकर, वैष्णवी कोल्हापूरकर आदी उपस्थित होते.
या महोत्सवात आशा वैशाली नगरकर (नटरंग कला केंद्र, मोडनिंब), श्रद्धा नेहा पुणेकर (लक्ष्मी कला केंद्र, सणसवाडी) आणि वैष्णवी कोल्हापूरकर (रेणुका कला केंद्र, आबंप फाटा वाठार, कोल्हापूर) या कलापथकाने आपली कला सादर करत लावणी रसिकांची मने जिंकली. तसेच 21 फेब्रुवारी रोजी जय अंबिका कला केंद्र (सणसवाडी), अलंकार ग्रुप पार्टी (अलंकार कला केंद्र, सुपा), अपर्णा किर्ती नगरकर आणि रेश्मा वर्षा परितेकर (लक्ष्मी कला केंद्र, सणसवाडी) या संघाने कला सादर केली.दि. 22 फेब्रुवारी रोजी गीता अश्‍विनी वाईकर, रेणुका कला केंद्र (कागल रोड, गोकुळ, शिरगाव), छाया पूजा श्रद्धा कोल्हापूरकर (रेणुका कला केंद्र, आबंप फाटा वाठार, कोल्हापूर) आणि रुक्मिणी, अर्चना, ज्योत्स्ना वाईकर (पिंजरा कलाकेंद्र) हे आपली कला सादर करतील. या लावणी महोत्सवाचा समारोप दि. 22 फेब्रुवारी रोजी होणार आहे. हा लावणी महोत्सव रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य असून श्रीरामपूर येथे होणार्‍या या महोत्सवात सहभागी कलाकार, कलापथके आणि संगीत-नृत्याचा मिलाफ असणार्‍या कार्यक्रमाचा रसिक प्रेक्षकांनी आस्वाद घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालकांनी केले आहे.याप्रसंगी जिल्ह्यासह तालुका व शहरातील लावणी रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

श्रीरामपूरकरांना आता मिळणार हक्काचे पाणी;भंडारदरा धरणाच्या पाटपाण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा सरकारला दणका;ऍड.काळे यांचा पाठपुरावा

श्रीरामपूर-भंडारदरा धरणाच्या पाटपाण्याच्या होत असलेल्या चोरी संदर्भात व त्यातून श्रीरामपूर तालुक्याच्या हक्काच्या पाण्यावर गदा येत असल्याबाबत शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष ऍड.अजित काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संभाजीनगर उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली

उंदिरगाव जमीन फसवणुक प्रकरण;दुधेडिया,छल्लानी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

श्रीरामपूर-उंदिरगाव येथील जमीन फसवणूक प्रकरणात जितेंद्र दधेडिया व प्रवीण छल्लाणी यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश श्रीरामपूर येथील प्रथम वर्ग न्यायाधीश जितेंद्र जाधव यांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणी

भाजपाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचविणार-मा.खा.विखे;नुतन उपाध्यक्ष विखे पाटलांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील प्रदेशस्तराच्या नियुक्त्या नुकत्याच घोषित करण्यात आल्या.यात पक्षाने अहिल्यानगर जिल्ह्याला मा खा. सुजय विखे पाटील यांच्या रुपाने मोठा बहुमान दिला. त्यांची प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती घोषित करण्यात

गणपतीच्या दर्शनाला जाताना काळाचा घाला;ट्रक व स्विफ्टचा भीषण अपघातात सहा जणांचा मृत्यू

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरानजीकच्या खंडाळा परिसरात श्रीरामपूर-बाभळेश्वर राज्य मार्गावर ट्रक व स्विफ्ट कारच्या समोरासमोर झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे.खंडाळा येथील पावन गणपतीच्या दर्शनाला जात असताना या कुटुंबाचा हा

कोणावरही अन्याय होऊ देणार नाही-पालकमंत्री विखे पाटील;आ.ओगले व नगराध्यक्ष ससाणे यांना दिले आश्वासन

श्रीरामपूर-श्रीरामपूर नगरपरिषद हद्दीतील जलसंपदा विभागाच्या जागेवरील रहिवाशी व व्यापाऱ्यांना जलसंपदा विभागाने अतिक्रमण काढणेकामी नोटीसा बजावल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाणे यांनी जलसंपदा

प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्यात कलमांची वाढ करा;जवरे यांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडे मागणी

श्रीरामपूर-येवल्यावरून येऊन बाभळेश्वर येथून आपल्या सहकाऱ्यांसोबत हॉटेल वरून जेवण करून घरी जात असताना जवरे यांच्यावर अचानक झालेल्या प्राणघातलक हल्ल्यात अज्ञात व्यक्ती विरोधात लोणी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत. परंतु

Latest News

Trending News

error: Content is protected !!