पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनातून शेतीचे आवर्तन होणार-आ.ओगले

श्रीरामपूर-श्रीरामपूर – राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाने यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील...

श्रीरामपूर-
श्रीरामपूर – राहुरी विधानसभा मतदारसंघाचे आमदार हेमंत ओगले आणि नगराध्यक्ष करण ससाने यांनी जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे श्रीरामपूर शहराला पाणीपुरवठा करण्याकरिता आवर्तन सोडण्याची मागणी केली होती त्यानुसार सध्या प्रवरा डावा कालव्यामधून पिण्याच्या पाण्याचे आवर्तन चालू आहे याच आवर्तनाला जोडून रब्बीचे दुसरे आवर्तन सोडण्याची मागणी आमदार हेमंत ओगले यांनी पालकमंत्री  राधाकृष्ण विखे पाटील आणि  जलसंपदा विभागाकडे केली होती.त्यानुसार पिण्याच्या पाण्याचे चालू असलेले आवर्तन हे पुढे सलग चालणार असून शेतीसाठीचे रब्बीचे आवर्तन हे वीस ते पंचवीस दिवस चालणार आहे.
         सध्या श्रीरामपूर नगरपरिषदेचे अमृत दोन योजनेचे काम चालू असल्याने शहराला दररोज पाणीपुरवठा होने करिता पिण्याच्या पाण्याचे आवर्तन होणे आवश्यक होते. लाभ क्षेत्रातील धरणांमध्ये मुबलक प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे या अनुषंगाने आमदार ओगले आणि नगराध्यक्ष ससाणे यांनी .आवर्तन सोडण्याची मागणी केली होती.शेतकऱ्यांनी आपले हक्काचे पाणी अबाधित राहण्यासाठी  ७ नंबर अर्ज भरून द्यावेत व आपले भरणे करून घ्यावेत याबाबत शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास त्यांनी मला अथवा नगराध्यक्ष करण ससाने यांच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन देखील आमदार ओगले यांनी केले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!