मागण्या मान्य न झाल्यास बेमुदत कामबंद;भूमि अभिलेख कर्मचाऱ्यांचा इशारा

श्रीरामपूर-भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या तांत्रिक आणि प्रशासकीय मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार...

श्रीरामपूर-
भूमि अभिलेख विभागातील कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळापासून प्रलंबित असलेल्या तांत्रिक आणि प्रशासकीय मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ आता राज्यभरातील कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. भूमि अभिलेख कर्मचारी कृती समिती, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देण्यात आले.
या निवेदनात म्हटले की, कर्मचाऱ्यांनी विविध स्तरांवरील मागण्यांचा पाठपुरावा केला आहे. यामध्ये प्रामुख्याने तांत्रिक वेतनश्रेणी लागू करणे, भूकरमापक व परिरक्षण भूकरमापक यांच्या वाढीव पदांसह सुधारित आकृतीबंध मंजूर करणे, मोजणी कर्मचाऱ्यांच्या प्रवासभत्त्याचा वेतनामध्ये समावेश करणे आणि विभागाचे खाजगीकरण थांबवणे या प्रमुख मागण्यांचा समावेश आहे. तसेच, तांत्रिक ज्ञान नसलेल्या अधिकाऱ्यांची या विभागात बदली करू नये, शेत रस्ते मोजणीच्या शासन निर्णयात सुधारणा करावी आणि जमाबंदी आयुक्त पद भारतीय अभियांत्रिकी सेवेतून भरावे, अशीही मागणी करण्यात आली आहे. प्रशासकीय पातळीवर ई-मोजणी २.० सॉफ्टवेअर युजर फ्रेंडली करणे, कर्मचाऱ्यांवर विनापरवाना थेट फौजदारी गुन्हे दाखल करण्याची अमानवी पद्धत बंद करणे, प्रत्येक कर्मचाऱ्याला लॅपटॉप आणि रोव्हरसारखे स्वतंत्र साहित्य पुरवणे आणि अतिरिक्त कामाचा मोबदला देणे अशा महत्त्वपूर्ण मागण्या आहेत.  निवेदन स्विकारल्यानंतर मंत्री विखे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी याविषयावर चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संग्राम वडितके, रेव्हेन्यू सोसायटीचे चेअरमन विजय हरिश्चंद्रे, महेश हरिश्चंद्रे, बाळासाहेब गायकवाड, गणेश दळवी, धनंजय राऊत, ज्ञानदेव खुर्पे, अण्णासाहेब चिंधे, कैलास डफळ, उमाकांत भागवत आदी उपस्थित होते.
आंदोलनाच्या नियोजित आराखड्यानुसार, १८ फेब्रुवारी रोजी सर्व कर्मचारी मोजणी साहित्य जमा करून काळ्या फिती लावून काम करतील. २० फेब्रुवारीपासून मोजणी काम पूर्णतः बंद ठेवले जाईल आणि २३ ते २६ फेब्रुवारी दरम्यान राज्यभरात सामूहिक रजा आंदोलन करण्यात येईल. त्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी पुणे येथील जमाबंदी आयुक्त कार्यालयावर ‘आक्रोश मोर्चा’ काढला जाणार असून, यानंतरही सरकारने दखल न घेतल्यास २ मार्च २०२६ पासून संपूर्ण राज्यात बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा समितीने दिला आहे.

या आंदोलनाचे नेतृत्व राज्य समन्वयक सुनील गोडसे, विभूतीचंद्र गजभिये, पवन केवटे, राहुल पाटील, किशोर इंगळे, दिपाली मुरकुटे, सुरज रामटेके, विवेक कोठाळे, कमलाकर पोतदार, संजय बोर्डे, अभय पाटील आणि धनाजी बाबर हे करत असून राज्यभरातील सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. कर्मचाऱ्यांच्या या न्याय्य हक्कांच्या लढ्यामुळे मोजणीची कामे ठप्प होण्याची शक्यता निर्माण झाली असून याची संपूर्ण जबाबदारी शासनाची असेल, असेही समितीने स्पष्ट केले आहे. निवेदनाच्या प्रति मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे मुख्य सचिव, तसेच महसूल व वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांनाही पाठविण्यात आल्या आहेत.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!