नराधम आरोपी शिक्षकावर कडक कारवाई करा;महाराष्ट्र राज्य महिला आयोगाचे निर्देश

श्रीरामपूर– श्रीरामपूर शहरातील एका नामांकित मराठी शाळेत वर्ग शिक्षकाने चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य...

श्रीरामपूर–

श्रीरामपूर शहरातील एका नामांकित मराठी शाळेत वर्ग शिक्षकाने चार अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याच्या गंभीर प्रकरणाची दखल घेत महाराष्ट्र राज्य महिला आयोग यांनी कठोर कारवाईचे निर्देश दिले आहेत.या प्रकरणी रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून तसेच लेखी निवेदनाद्वारे तक्रार दाखल केली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत आयोगाच्या अध्यक्षा यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
आयोग कार्यालयातील समुपदेशक दुर्गा लांघी यांच्या माध्यमातून जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ वाकचौरे यांना १३ फेब्रुवारी रोजी पत्र पाठवण्यात आले. संबंधित पत्रात श्रीरामपूर तालुक्यातील प्राथमिक शाळेतील शिक्षकावर चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार केल्याचा आरोप असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ही घटना अत्यंत निंदनीय असून शिक्षण व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी असल्याचे आयोगाने स्पष्ट केले आहे.
आयोगाने संबंधित प्रकरणात बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम २०१२ (POCSO) अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून उच्चस्तरीय सखोल चौकशी सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी संबंधित शाळा व कार्यक्षेत्रातील इतर शाळांमध्ये बालसुरक्षा नियमांचे कठोर पालन होते की नाही याचा तातडीने आढावा घेण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
या संवेदनशील प्रकरणात जिल्हा पोलीस प्रमुख सोमनाथ घारगे यांना स्वतः लक्ष घालून पीडित मुलींना न्याय मिळेल आणि दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई होईल, याची खात्री करण्याचे निर्देश आयोगाने दिले असून केलेल्या कारवाईचा सविस्तर अहवाल तात्काळ महिला आयोगाकडे सादर करण्यास सांगितले आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!