‘त्या’ नराधम शिक्षकाला न्यायालयाच्या आवारातच बदडले;संतप्त महिलांकडून बेदम चोप

श्रीरामपूर-शहरातील नामांकित मराठी शाळेतील इयत्ता दुसरीच्या ४ चिमुकल्या विद्यार्थ्यांनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी आरोपी शिक्षक सचिन गोणारकर याच्यावर आजश्रीरामपूर न्यायालयाच्या आवारात...

श्रीरामपूर-
शहरातील नामांकित मराठी शाळेतील इयत्ता दुसरीच्या ४ चिमुकल्या विद्यार्थ्यांनीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपी आरोपी शिक्षक सचिन गोणारकर याच्यावर आज
श्रीरामपूर न्यायालयाच्या आवारात संतप्त महिलांनी हल्ला केला. नराधम शिक्षकाला या महिलांनी बेदम मारहाण करत चांगलाच चोप दिला.पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने या नराधम शिक्षकाची संतप्त महिलांच्या तावडीतून सुटका झाली.
पोलीस कोठडीत असलेल्या शिक्षक सचिन गोणारकर याला आज दि.12 फेब्रुवारी रोजी पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले होते.यावेळी त्याच्यावर संतप्त महिलांनी हल्ला केला.पोलिसांनी त्याची सुरक्षा केल्याने आरोपी वाचला.दरम्यान या घटनेमुळे न्यायालयाच्या आवारात काही काळ गोंधळ निर्माण होवुन तणावपूर्ण वातावरण झाले होते.दरम्यान चिमुकल्या मुलींवर झालेल्या या अत्याचाराच्या घटनेने पालक वर्गात संतापाचे वातावरण आहे. तसेच आता शाळेतही मुली सुरक्षित नसल्याने पालक चिंता व्यक्त करत असून या घटनेतील नराधम आरोपी शिक्षकाला कठोर शिक्षा करावी अशी मागणी केली जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

सिद्धेश्वर मंदिरात चोरीचा प्रयत्न फसला;पोलीस आणि ग्रामस्थांच्या सतर्कतेने तीन चोरटे गजाआड

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील गळनिंब येथे 12 जूनच्या मध्यरात्री येथील ग्रामदैवत श्री.सिद्धेश्वर मंदिरातील दानपेटी फोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तीन चोरट्यांना पोलिसांच्या पथकाने जेरबंद केले.आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली दुचाकी,विविध कंपनीचे मोबाईल फोन

‘अशोक’चे व्हा.चेअरमन झुराळे यांचा टाकळीभानकरांकडून सन्मान

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्याची कामधेनु म्हणून संबोधल्या जाणाऱ्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या नूतन व्हा. चेअरमन पदी निवड झाल्याबद्दल खैरी निमगाव येथील प्रगतशील शेतकरी आदिनाथ पा. झुराळे यांचा टाकळीभान येथील उत्तमराव पवार यांच्या

कर्जमाफीच्या शासन आदेशाची प्रत्येक गावात होळी करणार;शेतकरी संघटनेचे औताडेंचा इशारा

श्रीरामपूर-माळेवाडी येथे शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी च्या नावाखाली केलेल्या फसवणूकीच्या शासन आदेशाची होळी करण्यात आली.यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल औताडे  म्हणाले की,विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप राष्ट्रवादी काँग्रेस

शिवसेना पदाधिकारी कहाणेसह सात जणांवर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील शिवसेनेचा पदाधिकारी प्रशांत कहाणे यांच्यासह आणखी इतर सात जणांवर एका महिलेच्या तक्रारीवरून ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.शहर पोलीस ठाण्यात भा न्या सं कलम 189,190,192,351(2),352, अनुसूचित जाती आणि

शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर गोळीबार;श्रीरामपूरात खळबळ;वाढत्या गुन्हेगारीचे पोलिसांपुढे आव्हान

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील गोंधवणी परिसरात शिवसेना (शिंदे गट) युवा विधानसभा संघटक प्रशांत कहाणे यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केला. दि.८ जून रोजी रात्री पावणेदहा वाजेच्या सुमारास ही गोळीबारीची घटना घडली. या जीवघेण्या

खाजगी कोचिंग क्लासेसवर कारवाई करा;जिल्हाधिकाऱ्यांकडे रिपाईची मागणी

श्रीरामपूर-श्रीरामपूर तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील मनमानी पद्धतीने विद्यार्थ्यांकडून क्लासची फी घेणाऱ्या कोचिंग क्लासवर कारवाई करावी या मागणीचे निवेदन रिपाईचे जिल्हा कार्याध्यक्ष सुभाष त्रिभुवन यांनी जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांना आज दिले आहे.जिल्हाधिकारी

Latest News

Trending News

error: Content is protected !!