श्रीरामपुरात शिक्षकाकडून दुसरीच्या वर्गातील चार मुलींवर अत्याचार;पोलिसांत गुन्हा दाखल

श्रीरामपूर-शहरातील एका नामांकित मराठी शाळेतील शिक्षकाने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या आठ वर्षीय चार चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे....

श्रीरामपूर-
शहरातील एका नामांकित मराठी शाळेतील शिक्षकाने दुसरीच्या वर्गात शिकणाऱ्या आठ वर्षीय चार चिमुकलींवर लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी संबंधित शिक्षकाला श्रीरामपूर शहर पोलिसांनी अटक अटक केली असून त्याच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या घटनेने शहरात संतापाची लाट उसळली आहे.गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासणाऱ्या या घटनेमुळे तालुक्यासह जिल्ह्यात खळबळ उडाली असुन संबंधित लिंगपिसाट शिक्षकाला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विविध संघटना व पालक वर्गामधून केली जात आहे.
शहरातील एका नामांकित मराठी शाळेतील शिक्षक सचिन महाजन गोणारकर (वय ३५, रा. गोणार्क, ता. कंधार, जि. नांदेड, हल्ली मुक्काम -वार्ड नंबर ०७, श्रीरामपूर) या शिक्षकाने तो शिकवत असलेला वर्गातील इयत्ता दुसरीतील ४ विद्यार्थिनींवर केलेल्या अत्याचाराची माहिती संबंधित विद्यार्थिनींनी त्यांच्या पालकांना सांगितली.घडलेल्या प्रकारचा जाब विचारण्यासाठी पालकांनी तातडीने शाळा गाठली.दरम्यान संस्थेच्या प्रमुखांनी सदरचे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत जाऊ देऊ नका असे पालकांना सांगितले.त्यामुळे पालकांनी याबद्दल संस्थेच्या प्रमुखांबद्दल प्रचंड चीड व्यक्त केली. त्यानंतर पालकांनी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेऊन सदर प्रकार त्यांच्या कानावर घातला.याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात सचिन महाजन गोणारकर या लिंगपिसाट शिक्षकाविरोधात पोस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आलेली आहे.या लिंग पिसाट शिक्षकाला कठोर शिक्षा करण्यात यावी अशी मागणी पालक वर्गातुन केली जात आहे.

बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा: +91 98229 83223

संबंधित बातम्या

तीन महिन्यात उभा राहणार डॉ. आंबेडकरांचा भव्य पुतळा;मा.खा.डॉ.सुजय विखे पाटील यांचा श्रीरामपूरकरांना शब्द

श्रीरामपूर-भारतीय जनता पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णआकृती पुतळा स्मारक समितीच्या वतीने 'समाज भूषण पुरस्कार' देऊन गौरविण्यात आले. यावेळी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत हा

हक्काच्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्याच्या आवारातच पेटवल्या चुली;आकारी पडीत शेतकऱ्यांचे जेलभरो आंदोलन

श्रीरामपूरश्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यासमोर आकारी पडीक शेतकऱ्यांनी चुली मांडून आपल्या जेलभरो आंदोलनाला सुरुवात केली आहे.या आंदोलनात शेतकरी आपल्या गुराढोरांसह सामील झाले आहेत.आकारी पडीत शेतकऱ्यांच्या वारसांना जमीन वाटप न्यायालयाच्या निकालानंतरही रखडले

सरपंच पतीची घरासमोर लावलेली चारचाकी जाळली;जाफराबाद येथील घटनेने खळबळ

श्रीरामपूर-श्रीरामपूर तालुक्यातील जाफराबाद (जिजाऊनगर) येथील सरपंच सौ.शेलार यांचे पती सामाजिक कार्यकर्ते संदीप शेलार यांची एक्सयूव्ही MH 48 A 5427 (सिल्वर कलर) हि घरासमोर लावलेली चारचाकी कार एका अज्ञात आरोपीने काल

श्रीरामपुरात नगरपालिकेच्या कंत्राटी कामगाराला मारहाण;दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरातील वॉर्ड नं. ०२ मध्ये औषध फवारणीसाठी गेलेल्या कंत्राटी कामगाराला गचांडून मारहाण करण्याचा प्रकार घडला असून १५ दिवसातील हा दुसरा प्रकार आहे.राहुल सखाराम चव्हाण, वय-२०, धंदा-मजूरी याने पोलिसात फिर्याद

भोंदू अशोक खरातचा पाय आणखी खोलात; श्रीरामपूरात खरातसह दोघांवर गुन्हा दाखल

श्रीरामपूर-पत्रकारांवर होणाऱ्या दबाव आणि धमक्यांच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, श्रीरामपूरमध्ये एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. नाशिक येथील भोंदू बाबा अशोक खरात याच्या अडचणीत पुन्हा एकदा मोठी भर पडली असून

श्रीरामपूरात पोलिसांनी काढली सराईत आरोपीची धिंड;भाईगिरीला चाप लावण्यासाठी पोलीस सरसावले

श्रीरामपूर-श्रीरामपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारांनी हैदोस माजवला आहे. सर्वसामान्य नागरिकांना त्यामुळे प्रचंड त्रास सहन करावा लागत होता.गल्लीबोळातुन उदयास येऊ लागल्या 'भाई व दादा' यांना कायद्याचा चाप लावण्यासाठी अखेर पोलिसांनी

Latest News

Trending News

error: Content is protected !!